संतापजनक : 15 वर्षाच्या मुलाने अवघ्या 6 वर्षांच्या मुलीवर केला बलात्कार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – शेतात कापूस वेचण्यास चल, असे म्हणून अवघ्या सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला. पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलाने हे संतापजनक कृत्य केले. राहुरी तालुक्यात ही घटना घडली.

याबाबत माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील एका गावात 15 वर्षाच्या मुलाने शेजारी राहणार्‍या सहा वर्षाच्या मुलीस कापूस वेचण्यास चल, असे म्हणून शेतात नेले. तेथे गेल्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. घडलेल्या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितले, तर तुझ्या मम्मीला मारील, अशी धमकी त्या मुलीला दिली.

याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने राहुरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून अल्पवयीन आरोपीविरुद्ध गुन्हा ‘पोस्को’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी डीवायएसपी राहुल मदने, पोलिस निरीक्षक मुकूंद देशमुख यांनी भेट दिली. सपोनि राक्षे हे पुढील तपास करीत आहेत.

Visit : Policenama.com