संतापजनक ! उपचारासाठी आलेल्या दीराकडून वहिनीवर बलात्कार

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – मुतखड्याच्या उपचारासाठी आल्यानंतर आजारपणात मदत करणाऱ्या वहिणीच्या एकटेपणाचा फायदा घेत तिच्यावर दीरानेच बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरमध्ये उघडकिस आला आहे. याप्रकरणी दीरावर गिट्टीखदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तो गुन्हा दाखल होताच गुजरातला पळून गेला. याप्रकरणी ३० वर्षीय पिडीत महिलेने तक्रार दिली आहे.

फिर्यादी महिला मुळची राजस्थानातील बाडमेरची राहणारी आहे. पतीसोबत ती दाभा परिसरात भाड्याने राहते. तिचा पती फर्निचर बनविण्याची कामे करतो. आरोपी हा महिलेच्या पतीचा चुलत भाऊ आहे. तर तो गुजरातमध्ये सुरत येथे राहतो. दरम्यान, त्याला मुतखड्याचा आजार असल्याने तो नागपूरला उपचारासाठी आला होता. त्यावेळी तो पिडीत वहिणीच्या घरी थांबला होता.

५ एप्रिल रोजी पिडीतेचा पती कामानिमित्त घराबाहेर गेला. त्यावेळी ती स्वयंपाक घरात स्वयंपाक करत असताना तिने त्याला बाम लावून मागितला. त्यावेळी बाम लावण्याच्या बहाण्याने त्याने तिला शरीर संबंधांची मागणी केली. परंतु तिने नकार दिला. मात्र, दीराने तिच्यावर बलात्कार केला. आठवड्यापासून पत्नी तणावात असल्याचे पाहून पतीने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली. तेव्हा तिने सर्व हकिकत सांगितली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.