खळबळजनक ! डोळ्यात ‘स्प्रे’ मारून केलं अपहरण, केला 3 वेळा ‘गँगरेप’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – संपूर्ण जगात नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत सुरु असताना कोल्हापूरमध्ये बलात्काराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गारगोटीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आले आहेत. सगळ्यात धक्कादायक म्हणजे मुलीच्या डोळ्यात स्प्रे मारुन तिला मोटारसायकलवरून जबरदस्तीने पळवून नेत तिच्यावर तीन वेळा सामुहीक अत्याचार केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोघांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पीडित मुलीने आरोपींना विरोध करत असताना तिच्यावर जबरदस्तीने तीन वेळा बलात्कार केल्याचे पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच तिच्या डोळ्यात स्प्रे मारून तिला दुचाकीवरून जबरदस्तीने पळवून नेत अत्याचार केल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.

पीडित मुलीने सचिन शिंदे आणि अन्य एका विरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपींविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पीडित मुलीची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

मधुमेह असल्यास आहारामध्ये करा ‘या’ ४ पदार्थांचा समावेश
‘हे’ ७ उपाय केल्यास सतत येणारा थकवा जाईल पळून, जाणून घ्या
जेवण पॅक करण्यासाठी ‘फॉईल पेपर’ वापरता ? ‘हे’ ७ दुष्परिणाम जाणून घ्या
मासिक पाळीत स्वच्छता राखण्यासाठी ‘या’ ६ गोष्टी लक्षात ठेवा !
गूळ खाण्याने वाढते वजन, जास्त खाण्याचे ‘हे’ ६ तोटे जाणून घ्या
मातेच्या स्तनपानामुळे बाळांना होतात ‘हे’ ६ फायदे, जाणून घ्या
लवंग खाण्याचे ‘हे’ ६ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?