विधवा महिलेवर शारीरिक अत्याचार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी येथील वृद्ध विधवा महिलेवर शारीरिक अत्याचार करण्यात आला. या घटनेमुळे कर्जत तालुक्यात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी गोरख भागुजी शिंगटे (वय 45) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून कर्जत पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

याबाबत माहिती अशी कि, राक्षसवाडी खुर्द येथे 5 जुलै रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास गावातील गरीब वृध्द महिला तिला मिळालेल्या घरकुलात होती. तिची सून ही बाळंतपणासाठी माहेरी गेली होती. मुलगा गाडीवर ड्रायव्हर असल्याने बाहेरगावी गेला होता. दुपारी सदर महिला घरामध्ये सारवण करीत होती. यावेळी गोरख भागुजी शिंगटे (वय 45) हा घरामध्ये घुसला. त्याने त्या वृद्धेवर अत्याचार केला. त्यानंतर हा प्रकार कोणाला सांगू नये यासाठी जिवे मारण्याची धमकी देत पळून गेला.

सदर महिलेने घडलेला प्रकार तिच्या भावाला संगितला. भावाने तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गोरख शिंगटे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्तनाचा कॅन्सर, डायबेटीजचा धोका कमी करण्यासाठी ‘हे’ सेवन करा

रोग प्रतिकारशक्तीवर परिणामकारक ठरतात ‘या’ गोष्टी

दररोज ४ काजू, ८ मनुका सेवन करा, झटपट बरे होतील ‘हे’ आजार

असे ठेवा ‘मेंदू’वर नियंत्रण, जाणून घ्या ‘हे’ सोपे उपाय

आंब्याची पानेही आरोग्यासाठी आहेत ‘फायदेशीर’

पावसाळ्यात खा भरपूर ‘जीवनसत्व’ असलेला आरोग्यदायी ‘राजमा’

Loading...
You might also like