धक्कादायक ! बलात्कारही केला, साडे १५ लाखही घेतले आणि व्हिडीओ नातेवाईकांना पाठवून बदनामी केली

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – व्यवसाय सुरु करण्याचे अमिष दाखवून, महिलेशी जवळीक साधली. शितपेयात गुंगीचे औषध टाकून, लॉजवर नेवून बलात्कार केला. त्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करुन ते सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत साडे पंधरा लाख रुपयांची खंडणी उकळली. त्यानंतर पीडित महिलेच्या नातेवाईकांना व्हिडीओ पाठवून बदनामी केली. हा प्रकार दिघी येथे वारंवार घडला.

या प्रकरणी पीडित ३७ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. तर निलेश भारत पैलवान (रा. वडगाव शेरी, पुणे) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि निलेश या दोघांची मुंबईत काम करताना ओळख झाली. निलेश याने पीडित महिलेस मिल्क पावडरचा व्यवसाय सुरु करुन देतो असे अमिष दाखवले. त्याने शितपेयात गुंगीचे औषध टाकून बेशुद्ध करुन महिलेस लॉज वर नेले. तिथे तिच्यावर बलात्कार करून त्याचे चित्रीकरण केले. हे सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत साडे पंधरा लाख खंडणी घेतली. तसेच ते व्हिडीओ महिलेच्या नातेवाईक व मित्रांना पाठवून बदनामी केली. याबाबत बदलापूर येथे महिलेने फिर्याद दिली होती. तेथील पोलिसांनी झिरो नंबरने हा गुन्हा दिघी पोलिसांकडे वर्ग केला आहे.

You might also like