संतापजनक ! सायन रुग्णालयात महिलेवर बलात्कार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईतील सायन रुग्णालयात एका ३७ वर्षीय महिलेवर रुग्णालायतील सफाई कामगारानेच बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायन पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

दीपक कुंचीकुर्वे ( वय ३१ ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. दीपक कुंची कुर्वे हा सायन रुग्णालयात झाडलोट करण्याचे काम करतो.

– बहिणीची देखभाल करण्यासाठी आली होती महिला
सायन रुग्णालायात पिडीत महिलेची बहिण दाखल आहे. तिच्यावर तेथे उपचार सुरु आहेत. दरम्यान ती बहिणीची देखभाल करण्यासाठी रुग्णालयात आली होती. त्यावेळी तिची आणि त्याची ओळख झाली.

– शुक्ल सवलतीचा फॉर्म भरण्याच्या बहाण्याने केला बलात्कार
पिडीत महिलेच्या बहिणीवर उपचार सुरु असताना तो तेथे येत होता. त्यामुळे त्याची महिलेसोबत ओळख झाली. त्यावेळी त्याने तिला शुल्कामध्ये सवलत देणाऱा फॉर्म भरण्याच्या बहाण्याने पाचव्या मजल्यावरील निर्जन ठिकाणी घेऊन गेला. त्यानंतर तिच्यावर तेथे बलात्कार केला. महिलेने लागलीच याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सायन पोलिसांनी रुग्णालयातील सीसीटिव्ही फुटेज तपासून त्याला अटक केली.