बहिणीला जिवे मारण्याची धमकी देत तरुणीवर लैंगिक अत्याचार

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन –भोसरी, एमआयडीसी येथे बहिणीला जिवे मारण्याची धमकी देत एका तरूणीवर तरूणाने बलात्कार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

टेकराज व्दारका ओढ (रा. अर्जुन इंजिनिअरींग कंपनी समोरील झोपडपट्टी, एमआयडीसी, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत तरूणीने भोसरी, एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

लग्नासाठी ‘ती’ भय्यू महाराजांना ब्लॅकमेल करत असल्याचे उघड 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरूणीच्या बहिणीला जिवे मारण्याची धमकी देत आरोपी टेकराज याने तिच्यावर गेल्या दोन वर्षांपासून बलात्कार केला. तसेच तिला लाथाबुक्यांनी मारहाणही केली. आरोपी टेकराजला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.