लग्नाचे आमिष देऊन युवतीवर लैंगिक अत्याचार 

शेगाव : पोलीसनामा ऑनलाइन – लग्नाचे आमिष देऊन युवतीवर बलात्कार केल्याप्रकरणी युवकासह नऊ जणांविरुद्ध शेगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, वैभव सदाशिव तोरखडे (वय २६, रा. सौंदळा ता. तेल्हारा जि.अकोला) याचे गावातीलच एका युवतीसोबत प्रेम संबंध होते. नोकरी लागल्यानंतर आपण विवाह करु, असे आमिष देत त्याने युवतीसोबत शारीरीक संबंध प्रस्थापित केले. वैभव तोरखडे याने २०१८ मध्ये या युवतीबरोबर केलेल्या शरीरसंबंधातून ही युवती गर्भवती राहिली होती.

घरमालकाकडून भाडेकरू महिलेचा विनयभंग

त्यावेळी वैभव तोरखडे, राहुल शिंत्रे यांच्यासह संतोष महादेव तोरखडे, अरुण वामन शिंत्रे, नवलकुमार साहेबराव अरबट, निलेश सुरेश खंडेराव, महादेव प्रल्हाद तोरखडे, सदाशिव प्रल्हाद तोरखडे,  रंजना तोरखडे (सर्व रा.सौंदळा ता. तेल्हारा जि. अकोला) यांनी युवतीचा गर्भपात घडवून आणण्याचा कट रचला. यामुळे झालेल्या रक्तस्रावामुळे २७ आॅक्टोबर २०१८ रोजी अकोला येथील एका हास्पिटलमध्ये युवतीने उपचार घेतला. यानंतर आरोपींनी युवतीस तिच्या गावी नेऊन सोडले व जातिवाचक शिविगाळ केली. यापुढे लग्नाचा विचार केल्यास, जीवे मारण्याची धमकी दिली.

यानंतर १ जानेवारी २०१९ रोजी वैभव तोरखडे व राहूल मुरलीधरन शिंत्रे यांनी शेगांव येथे एका गेस्ट हाऊसवर युवतीला नेवून अत्याचार केला. दरम्यान याप्रकरणी पिडीत युवतीने शेगांव शहर पोलिस स्टेशनला तक्रार दिली. यावरून युवकासह नऊ जणांविरुद्ध सोमवारी  विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.