Facebook वरील मित्राने लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – फेसबुकवर ओळख झालेल्या एका तरुणानं २५ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार केला. एवढंच नाही तर पीडितेकडून २ लाख रुपयेही उकळले. हि घटना मुंबईतील बजाजनगर याठिकाणी घडली आहे. याप्रकरणी वाळूंज एमआयडीसी पोलीस ठाण्यात पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील मुकुंदवाडी येथील रोहन राजेंद्र खाजेकर (वय २८) याची फेसबुकच्या माध्यमातून दोन वर्षांपूर्वी पीडित तरुणीशी ओळख झाली. दोघेही बऱ्याच दिवसापासून संपर्कात होते. रोहन पीडितेला भेटण्यासाठी मुंबईलाही आला होता. त्याचबरोबर औरंगाबादमधील प्रोझोन मॉलमध्येही दोघांची भेट झाली होती. दरम्यान रोहनने लग्नाचं आमिष दाखवून सातत्यानं पीडितेशी शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली होती. मात्र तिने नकार दिला. परंतु मार्चमध्ये पीडिता राहत असलेल्या बजाजनगर येथे रोहन डबा घेण्याच्या निमित्ताने आला. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत त्याने पीडितेवर बलात्कार केला. या घटनेनंतर पीडितेनं रोहनला फोन केला असता, त्यानं बोलण्यास आणि लग्न करण्यास नकार दिला. धक्कादायक म्हणजे पीडितेची ओळख झाल्यानंतर रोहनने आपल्या आईशी तिचे वळणे करून दिले होते. रोहनच्या आईने लग्न झाल्यानंतर संसाराला पैसे लागतील त्यामुळे तिला मुलाकडे पैसे पाठवण्यास सांगितले होते. त्यानुसार पीडिता दरमहा १० ते १२ हजार रुपये पाठवत होती. साधारण दोन लाख रुपये तिने रोहनच्या खात्यावर पाठवल्याचे पीडितेनं तक्रारीत म्हटलं आहे.