9 वीच्या विद्यार्थीनीवर अनेकदा बलात्कार, व्हिडीओ बनवून केलं ब्लॅकमेल

पोलीसनामा ऑनलाइन – राजस्थानमधील बुंदी येथील शिक्षकाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिचे व्हिडीओ बनवत ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक असा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुलीच्या कुटूंबियांनी दबलाना पोलीस ठाण्यात शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता ९ वी मध्ये शिकत असून शिक्षक तिसरीच्या वर्गाला शिकवतो. तो त्या पीडित मुलीस धमकी देत भीती घालायचा. यामुळे नाईलाजाने तिला त्या नराधम शिक्षकाकडे जावे लागत असे. आरोपी शिक्षक धर्मराजा मीणा याने तीन ते चार वेळा मुलीवर अत्याचार केला. पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून, तपास हिंडोली सीआय मुकेश मीणा यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. सध्या पीडित मुलीची रुग्णालयात वैद्यकीय तपासणी सुरु आहे. तिच्या जबाबाच्या आधारे पोलीस तपास करत कारवाई करतील.

याबाबत बोलताना तपास अधिकारी मुकेश मीणा यांनी म्हटलं, मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ते म्हणाले, आरोपी कधी सीडी तर कधी पुस्तकाच्या बहाण्याने मुलीस शाळेत बोलवायचा. तेव्हाच तो तिच्यावर अत्याचार करत असे. तर पोलिसांनी सांगितले, आरोपी शिक्षकाने मुलीस दुसऱ्या गावी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. नंतर व्हिडीओ बनवत तिला ब्लॅकमेल केले. पोलीस आरोपी शिक्षक धर्मराजा मीणा याचा शोध घेत आहेत.