ओरडलीस तर मारेन…. धमकी देत मेहुणीवरच अत्याचार 

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन – बहिणीकडे राहण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मेहूणीला गळा दाबून मारण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार बारामती एमआयडीसी येथे समोर आला आहे. याप्रकरणी बारामती तालुका पिडीतेच्या बहिणीच्या नवऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत अल्पवयीन मुलीची बहिण बारामती एमआयडीसी येथे राहते. ती बहिणीच्या घरी राहण्यासाठी आली होती. उन्हाळ्याचे दिवस असल्याने रोज ते घराबाहेर झोपतात. परंतु विंचूकाट्याची भिती दाखवून तिच्या बहिणीच्या नवऱ्याने तिला एकटीलाच घरातील एका खोलीत झोपण्यास सांगितले. त्यानंतर तो मध्यरात्री तिच्या खोलीत आला. तिचा गळा दाबत ओऱडलीस तर जीवे मारेन अशी धमकी दिली आणि अत्याचार केले. दरम्यान याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब जाधव करत आहेत.