जळगाव : विवाहीतेवर 2 भावंडांकडून बलात्कार

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – शिरसोली शिवारातील मोहाडी परिसरात मंगळवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. शेतमालकाने कामावरुन काढून टाकल्याच्या रागातून कलशा गंगाराम बारेला व बलशा गंगाराम बारेला (रा. शिरसोली ता. जळगाव) या दोघांनी २० वर्षीय विवाहितेवर आळीपाळीने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. दरम्यान, त्यावेळी पत्नीवर बलात्कार करताना पतीने एकाला पकडले, पण हाताला झटका देऊन तो पसार झाला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरील पीडित महिला व तिचा पती ढाके नावाच्या शेतकऱ्याच्या शेतात वास्तव्य करीत होते. तर संशयित आरोपी कलशा व बलशा हे दोघे जण बाहू राजू बारी यांच्या शेतात वास्तव्याला होते. दारु पिण्याची सवय असल्याच्या कारणावरुन कलशा याला शेत मालकाने कामावरुन काढले. मंगळवारी रात्री तोच राग मनात धरुन कलशा याला घरुन का काढून टाकले असा जाब बलशाने पीडितेच्या पतीला विचारुन दोघांना मारहाण करण्यात सुरुवात केली. तेव्हा घाबरलेल्या पीडितेच्या पतीने मदतीसाठी शांताराम बारेला यांना बोलवायला गेलं असताना आरोपींनी त्यावेळेस पीडितेवर बलात्कार केला. पीडिता धावत गेली असता कडेवर असलेल्या लहान मुलीला सुद्धा त्यांनी बाजूला फेकून दिले. दरम्यान, पीडितेवर बलात्कार होत असतानाच तिचा पती आला असता त्यांना पाहून बलशा पळून गेला तर कलशा याला दोघांनी पकडून ठेवले. पण तो हाताला झटका मारुन पळून गेला.

रुग्णालयात नोंदवला जबाब
घडलेल्या घटनेनंतर पोलीस पाटलाने एमआयडीसी पोलिसांना सदरील घटनेची माहिती दिली. पीडित महिलेस रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मानव संसाधन विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनंदा पाटील यांनी रुग्णालयात जावून पीडितेचा जबाब नोंदवून घेतला. त्यानंतर पोलिसांनी कलशा व बलशा यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंद केला. पोलीस पुढील तपास करत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like