बीड जिल्ह्यातील धक्कादायक घटना ! परळीमध्ये विवाहितेवर बलात्कार, पीडितेनं केलं ‘असं’ काही

परळी : पोलीसनामा ऑनलाईन – परळीमध्ये एका विवाहित तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. झालेल्या प्रकारामुळे होत असलेला अपमान आणि मनस्ताप यामुळे पीडित तरुणीने विष पिऊन आपले जीवन संपवले आहे. या धक्कादायक प्रकारामुळे बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

ही घटना परळी तालुक्यातील गोपाळपूर येथे घडली आहे. ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. माउली लक्ष्मण नवघरे असे आरोपीचे नाव आहे. महिलेचा नवरा बाहेरगावी असतो याचा फायदा घेऊन रात्री घरात घुसून आरोपीने तिच्यावर बलात्कार केला.

या प्रकारामुळे अपमान आणि मनस्ताप सहन न झाल्यामुळे पीडित तरुणीने विष पिऊन आपल्या जीवनाचा अंत केला आहे. आरोपी माउली लक्ष्मण नवघरे वर परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You might also like