संतापजनक ! आखाड्यावरील सालगड्याच्या पत्नीवर दोघांचा बलात्कार

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – एका साल गड्याच्या पत्नीवर दोघांनी मिळून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे. या प्रकरणी दोघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 4 डिसेंबर रोजी ही घटना घडली. अरविंद जाधव आणि लखन मोटे अशी आरोपींची नावं आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार सदर पीडित महिलेचा पती एका शेतातील आखाड्यावर सालगडी म्हणून काम करत होता. महिला एका धाब्यावर स्वयंपाकाचं काम करत होती. पीडित महिला कामावरून आल्यानंतर कुटुंबासह आखाड्यावर येऊन झोपली होती. रात्रीच्या वेळी दोन्ही आरोपी दबा धरून बसले होते. यावेळी महिला घराबाहेर आली असता अरविंद जाधव आणि लखन मोटे या दोघांनी मिळून तिला जबरदस्ती केली. तिला आखाड्याशेजारी असणाऱ्या खोलीत नेले. या ठिकाणी तिच्यावर आळी पाळीने बलात्कार केला. ती आरडाओरडा करू नये यासाठी तिचे तोंड दाबले. लिंबगाव हद्दीत हा सगळा प्रकार घडला.

दरम्यान महिलेनं कसाबसा बचावासाठी आरडाओरडा केला. यावेळी तिचा आवाज ऐकून तिचा पती बाहेर आला. त्यावेळी आरोपी तिथून फरार झाले. या घटनेनंतर महिलेनं लिंबगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. सहायक पोलीस निरीक्षक पल्लेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोटके हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Visit : Policenama.com

 

Loading...
You might also like