घृणास्पद ! नवी मुंबईत युवकाचा कुत्रीवर बलात्कार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अनेकदा प्राण्यांवर अत्याचार झाल्याचे आपण पाहत असतो. नवी मुंबईत देखील असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला असून एका भटक्या कुत्रीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. याप्रकरणी प्राणी मित्र संघटनेनं पोलिसांत गुन्हा दाखल केला होता.

प्राणीमित्र कार्यकर्ते विजय रंगरे यांनी या घटनेविषयी माहिती देताना सांगितले कि, या व्यक्तीने केवळ आताच असा गुन्हा केला नसून यापूर्वी देखील अनेक प्राण्यांवर अत्याचार केल्याचे या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा आरोपी नवी मुंबईमधील खारघर परिसरातील असून या कुत्रीवर बलात्कार देखील याच ठिकाणी करण्यात आला. त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरोधात कलम ३७७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. १५ ऑगस्ट दिवशी हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर हि कारवाई करण्यात आली आहे. स्थानिक वृत्तवाहिनीने या प्रकाराबाबत वृत्त दिले होते.

दरम्यान, या कुत्रीची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यानंतर तिच्यावर बलात्कार झाल्याचे सिद्ध झाले आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला दहा वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर या प्रकारामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like