‘मेव्हणी’चं अपहरण करून ‘बलात्कार’ केल्यानंतर ‘भावजी’ बनला ‘साधु’, 25 वर्षानंतर असं अडकले जाळ्यात

जयपुर : वृत्तसंथा – अल्पवयीन मुलीचे अपहरण करून नंतर तिच्यावर बलात्कार करणार्‍या आरोपीचा शोध राजस्थान पोलीस मागील 25 वर्षांपासून घेत होते. शेवटी तो साधुच्या वेशात पोलिसांना सापडला. टोंक जिल्ह्यातील टोडारायसिंह पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अरयाली गावात राहणार्‍या कानाराम माळीवर अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा आरोप होता. त्याच्यावर दोन हजार रूपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. आता कानारामला पकडण्यात जयपुरच्या गलता पोलीस ठाण्याच्या पोलिसांना यश आले आहे.

जयपुर उत्तरचे डीसीपी डॉ. राजीव पचार यांनी सांगितले की, 11 ऑगस्ट 1995 ला बासबदनपुरा येथे राहणार्‍या एका व्यक्तीने आपल्या जावयाविरूद्ध गलतागेट पोलीस ठाण्यात 15 वर्षांच्या मुलीचे अपहरण आणि बलात्काराची तक्रार नोंदवली होती. यानंतर आरोपी महुणा फरारी होता.

या आरोपीच्या शोधात असलेल्या गलतागेट पोलीस ठाण्याचे प्रमुख धर्मवीर सिंह यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आरोपीला सांगानेर परिसरातील भैरूंची बगीचा, सेक्टर 3 येथे पकडले. चौकशीनंतर खुलासा झाला की अटकेच्या भितीने त्याने अनेक वर्षांपूर्वी नाथ संप्रदाय स्वीकारला होता. नंतर तो दाढी, मिशी, केस वाढवून आणि वेश बदलून साधु होऊन राहू लागला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/