खळबळजनक ! पोलिसानेच केला महिला पोलिसावर बलात्कार

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – सांगलीतील विश्रामबाग पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने महिला पोलीस कर्मचाऱ्यावर लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी साताऱ्यातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिल सुभाष पवार (वय २७, शंभर फुटी रोड, विश्रामबाग सांगली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर याप्रकरणी २२ वर्षीय महिला पोलीस कर्मचाऱ्याने फिर्याद दिली आहे.

तक्रारदार तरुणी पोलीस दलात नोकरी करते. तर या दोघांची पोलीस दलातच ओळख झाली. त्यावेळी पवारने तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. त्यानंतर तुझ्याशी लग्न करतो. असे वचन दिले. त्यानंतर तिच्याकडून घर बांधण्यासाठी म्हणून ५० हजार रुपये घेतले. बराच वेळ गेल्यानंतर तिने त्याच्याकडे लग्नाबाबत विचारणा केली. तसेच त्याला पैसे मागितले. तेव्हा त्याने लग्न करण्यास आणि पैसे देण्यासही नकार दिला.

त्यानंतर अनिल पवार याच्या कुटुंबियांनीही त्याला दमदाटी व शिवीगाळ केली. त्यानंतर तक्ररादार तरुणीने याप्रकऱणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर करत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –