औरंगाबाद : ‘कोरोना’च्या पार्श्वभुमीवर प्रशासनानं घेतला मोठा निर्णय

नवी दिल्ली – कोरोना विषाणू संसर्गाने संपूर्ण देशात राज्याचा पहिला क्रमांक आहे. संसर्ग वाढू नये म्हणून युद्धपातळीवर प्रयत्नही सुरू आहेत. सोशल डिस्टन्सिंग, लॉकडाउन या सगळ्या उपायांना आपण आता सरावलोही आहोत. पण तरीही जर तुम्ही औरंगाबादेत राहात असाल आणि कामाव्यतिरिक्त रस्त्यावर जाण्याची इच्छा झालीच तर सावधान!!!! कारण राज्य सरकारने स्थानिक पोलिसांच्या मदतीला आता शहरात RAF (Rapid Action Force) म्हणजेच शीघ्र कृती दलाचे जवान तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. औरंगाबाद शहरात सर्व प्रकारची काळजी घेतली जात आहे.

मोठया प्रमाणावर जनजागृतीही केली जात आहे, पण इथे नागरिक अजूनही रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. पोलिसांनी कितीही कडक कारवाई केली तरीही नागरिक त्यांना दादच देत नाहीत. परिणामी शहरातील कोरोना रुग्णांची संख्या खूप वाढत आहे. हीच संख्या नियंत्रित राहावी,शेवटी शीघ्र कृती दलाला पाचारण करावं लागलं आहे. पोलिसांना बनवू असा फालतू अभिमान बाळगून रस्तांवरून मोकार फिरणाऱ्या औरंगाबादकराना मात्र आता सावध व्हावं लागणार आहे नाहीतर RAF चे जवान माया वगैरे दाखवणार नाहीत.