गंभीर आरोप करत गायिका हार्ड कौरचा ‘RSS’वर ‘निशाणा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मुंबईतील २६/११ च्या हल्ल्यात तसेच पुलवामा हल्ल्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार असल्याचा आरोप गायिका हार्ड कौर ने केला आहे. यासंबंधीची पोस्ट तिने इन्स्टाग्रामवर टाकली आहे. या पोस्टमध्ये तिने थेट सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावरच निशाणा साधला. हार्ड कौर या गायिकेने ही पोस्ट शेअर करत वाद निर्माण केला आहे. त्यामुळे आता सोशल मिडियावर तिच्यावर टीका केली जात आहे.

https://www.instagram.com/p/Byz0NSaAdol/?utm_source=ig_web_copy_link

याआधी देखील हार्ड कौरने सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांबाबत असे वाचाळ गरळ ओकली होती. परंतू तिने आता थेट उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ आणि मोहन भागवत यांनाच लक्ष केले आहे. त्यामुळे आता तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

मुंबईवरील २६/११ हल्ला, पुलवामा हल्ला यासह देशातील हल्ल्यांना संघ जबाबदार आहे. गोडसेने गांधीजींची हत्या केल्यानंतर सरदार पटेलांनी तुमच्यावर बंदी आणली होती. भारताच्या निर्मितीनंतर अनेकांचा बळी या जातीयवादी पक्षाने घेतला’ असा आरोप गायिका हार्ड कौरने केला आहे.

https://www.instagram.com/p/By0uGUAg6Gr/?utm_source=ig_web_copy_link

करकरे, गौरी लंकेश यांच्या हत्येला देखील संघ जबाबदार
‘जागे व्हा. तुम्ही तुमच्या बहीण-मुलींवर बलात्कार होण्याची वाट पाहत आहात का ? की त्यांनी तुमच्यावर हल्ला करण्यासाठी थांबलेले आहात ?’ असा सवाल देखील तिेने आपल्या पोस्टमध्ये केला आहे. हार्ड कौरने विचारला आहे. हार्ड कौरने यासारख्या इतर पोस्ट करत संघावर निशाणा साधला. करकरे, गौरी लंकेश यांच्या हत्येला देखील संघ जबाबदार असल्याचा आरोपही तिने संघावर केला.

तर मग योगींना कॉल करा
तिन योगींनी देखील लक्ष केले, योगी अदित्यनाथ जर सुपर हिरो असता तर त्याचे नाव रेपमॅन असते, तुम्हाला आई, बहीण आणि मुलीचा बलात्कार हवा असेल तर त्याला कॉल करा, अशी अतिशय खालच्या स्तराची टीका हार्ड कौरने योगींवर केली आहे.

संघावर निशाणा साधणारी हार्ड कौर कोण आहे
हार्ड कौर ही भारतीय रॅपर आणि हिप हॉप गायिका आहे. एक ग्लासी दो ग्लासी हे तीचे २००७ साली आलेले गाणे युकेमध्ये गाजले होते. जॉनी गद्दर या सिनेमातील पैसा फेंक या गाण्यामुळे तिची बॉलिवूडमध्ये ओळख झाली. तसेच सिंग इज किंग, किस्मत कनेक्शन, बचना ए हसिनो, आग, अजब प्रेम की गजब कहानी यासारख्या सिनेमात तिने पार्श्व गायिका म्हणून काम केले आहे. तर झलक दिखला जा 3 या डान्स शो मध्ये ती स्पर्धक होती.

सिने जगत –

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक

अभिनेत्रीने तिच्या हाताने उचलला तिचा लेहंगा, पुढे झाले असे काही

..म्हणून ‘बिग बॉस’ बॅन करण्यासाठी वकिलाची तक्रार दाखल