Video : समुद्रिकिनारी दिसली खूपच दुर्मिळ ‘एल्बिनो’ सील सोशलवर व्हायरल झाला व्हिडीओ

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   तुम्ही कधी एल्बिनो सील पाहिली आहे का ? ही खूप दुर्मिळ प्रजाती आहे जी समुद्र किनारी आढळत असते. रशियाच्या ट्युलनी द्वीपवर जन्माला आलेली एक नवीन एल्बिनो आपल्या अनोख्या रंगामुळं जगभरातील लोकांसाठी आकर्षणाचा केंद्र बनली आहे. याचा हलका लाल रंग कुटुंबातील इतर एल्बिनो सीलपेक्षा खूप वेगळा आहे.

सागरी सस्तन प्राणी जीवशास्त्रज्ञ व्लादिमीर बुर्कानोव यांनी या एल्बिनो सीलचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावरून शेअर केले आहेत. एल्बिनो सील एकांतात वाढते. आणि क्वचितच प्रजनन करते.

https://twitter.com/DolphinSeeker30/status/1304773768695422976?s=20

दुर्मिळ एल्बिनो व्हायरल झाल्यानंतर व्लादिमीर बुर्कानोव यांनी काही वर्षांपूर्वीच्या आणखी एाक एल्बिनो सीलची स्टोरी शेअर केली. जो फोटो त्यांनी शेअर केला त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, “एल्बिनो फर सीलमुळं लोकांचा यामधील रस जागृत झाला आहे. मी अशात प्रकारच्या असामान्य रंगाच्या जीवाच्या वयाबद्दल माहिती शोधण्याचा प्रयत्न केला.”

ते म्हणाले, “हा खास समुद्री जीव 2 किंवा 3 वर्षांचा होता. शारीरिकदृष्ट्या हा जीव चांगल्या आकारात होता. एवढंच नाही तर हे स्पष्ट होतं की, त्याचे डोळे खराब होते. मी त्याचं वय स्पष्ट करण्यासाठी त्याच्याकडे वळलो.”

एल्बिनो आता परिपक्व झाली आहे आणि ती 5-6 वर्षांची आहे. तिनं या सीजनमध्ये प्रजननात भाग घेतला नव्हता.