‘विषारी’ सापासोबत तब्बल अर्धा तास खेळला ‘मद्यापी’, पुढं झालं असं काही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल मीडियावर एका मद्यपीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दिसत आहे की, मद्यपी विषारी सापासोबत खेळत आहे आणि त्याला डिवचत फणा दाखविण्यासाठी आदेश देत आहे. तब्बल ३० मिनिट हा खेळ चालू होता, शेवटी साप चवताळला आणि त्याने त्या मद्यपीस चावा घेतला. त्यानंतर लोकांनी त्या मद्यपीस दवाखान्यात नेले. हैराण करून सोडणारा हा व्हिडीओ राजस्थान मधील दौसा जिल्ह्यातील बांदीकुई येथील आहे.
जहरीले सांप के साथ खेलने लगा शराबी, हुक्म द‍िया- लोगों को अपना 'फन' द‍िखा
या फोटोत एक मद्यपी शेतात एका सापासोबत बसलेला दिसतोय. मद्यपी सापाबरोबर संवाद साधत असून त्याचा जाण्याचा रस्ता अडवत आहे. मद्यपीच्या आजूबाजूला अनेक लोकांचा जमाव असून ते त्या मद्यपीस सापापासून लांब जाण्यास सांगत आहे.

मद्यपी अजिबात ऐकण्याच्या स्थितीत नाही. जो व्हिडीओ समोर येत आहे त्यात मद्यपी सापाला सांगत आहे की या सर्वांना फणा काढून दाखव. अशातच साप चवताळतो आणि मद्यपीच्या एका हाताला डसतो.
जहरीले सांप के साथ खेलने लगा शराबी, हुक्म द‍िया- लोगों को अपना 'फन' द‍िखा
हा खेळ जवळपास ३० मिनिट पर्यंत चालतो. जेव्हा सापाने मद्यपीस डसले तेव्हा त्याला एका गाडीत बसवून हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले.
जहरीले सांप के साथ खेलने लगा शराबी, हुक्म द‍िया- लोगों को अपना 'फन' द‍िखा
हा सर्व प्रकार बांदीकुई च्या गुडा कटला भागातील सांगितला जात आहे. मद्यपीचे नाव प्रकाश बैरवा सांगितले जात आहे. प्रकाश बैरवास जयपूरच्या एसएमएस हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. हा व्हिडीओ ३ दिवसांपूर्वीचा आहे असे सांगण्यात येत आहे परंतु व्हिडीओ आत्ता व्हायरल होत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/