Surya Grahan 2020 : कित्येक वर्षांनंतर दुर्मिळ ‘योग’, ‘रिंग ऑफ फायर’ सारखा दिसणार पूर्ण सूर्य

पोलीसनामा ऑनलाईन टीम – या वर्षाचे पहिले सूर्यग्रहण 21 जून रोजी होईल आणि हे पूर्ण ग्रहण ‘रिंग ऑफ फायर’सारखे दिसेल. यात चंद्र सूर्याला पूर्णपणे व्यापून टाकेल. चमकणाऱ्या सूर्याचा केवळ बाह्य भाग चमकदार दिसेल. एकंदरीत ते अंगठीसारखे दिसेल. दरम्यान, ‘रिंग ऑफ फायर’चे हे दृश्य काही सेकंदापासून ते 12 मिनिटांपर्यंत पाहिले जाऊ शकते. हे ग्रहण भारतीय वेळेनुसार सकाळी नऊ वाजता सुरू होईल व दुपारी तीन वाजेपर्यंत असेल. पूर्ण ग्रहण सकाळी 10:17 वाजता असेल. हे ग्रहण आफ्रिका, पाकिस्तानच्या दक्षिण भागात, उत्तर भारत आणि चीनमध्ये दिसून येईल. भारतात हे खंडग्रास चंद्रग्रहण होईल. उल्लेखनीय बाब म्हणजे 21 जून हा सर्वात मोठा दिवस असतो आणि त्या दिवशी इतके मोठे सूर्यग्रहण ही एक अनोखी वैज्ञानिक घटना आहे. असा योग्य बर्‍याच वर्षांनंतर आला आहे.

या दिवशी सूर्य आणि पृथ्वीच्या दरम्यान 15,02,35,882 किमी अंतर असेल. यावेळी, चंद्र आपल्या मार्गावर चालत 3,91,482 किमीचे अंतर राखेल. जगातील बहुतेक देशांमध्ये असा समज आहे की, पूर्ण ग्रहण एक हानीकारक घटना आहे. आज जेव्हा मानव चंद्रावर पोहोचला आहे, तेव्हा ग्रह नक्षत्रांचे वास्तव समोर आले आहे. सूर्य किंवा चंद्रग्रहण फक्त सावल्यांचा खेळ आहे. पृथ्वी आणि चंद्र दोन्ही सूर्याभोवती आपल्या वेगवेगळ्या कक्षांमध्ये फिरत असतात. सूर्य स्थिर आहे. पृथ्वी आणि चंद्राच्या प्रवासाची गती वेगवेगळी असते. सूर्याचा आकार चंद्रापेक्षा 400 पट मोठा आहे. परंतु पृथ्वीपासून सूर्याचे अंतर चंद्रापेक्षा अधिक आहे. या सततच्या परिक्रमादरम्यान जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये येतो, तेव्हा आपल्याला पृथ्वीवरून सूर्याचा एक भाग व्यापल्यासारख्या दिसतो. मात्र, घडते असे कि, पृथ्वीवर चंद्राची सावली पडते. या सावलीत उभे राहून सूर्याकडे पाहणे पूर्ण ग्रहण झाल्यासारखे दृश्य दिसते. सावलीचा भाग सूर्यप्रकाशापासून वंचित राहतो, म्हणून तिथेही अंधार पडतो.

दरम्यान, प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला चंद्र पृथ्वी आणि सूर्यामध्ये येतो, परंतु प्रत्येक वेळी ग्रहण लागत नाही. चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षाच्या सरळ असल्यासच आपल्याला ग्रहण दिसते. चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षाच्या तळाशी पाच अंशांचा कल असल्याने, प्रत्येक अमावस्येला तिन्हीही सरळ रेषेत येणे शक्य नाही. जरी बरेच टीव्ही चॅनेल पूर्ण सूर्यग्रहण थेट प्रसारित करतात, परंतु आपल्या अंगणातून किंवा टेरेसवरुन त्याला पाहणे जीवनाची अविस्मरणीय आठवण असेल. मात्र, उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहिल्यावर सूर्याच्या तीव्र किरणांमुळे डोळ्यांचे नुकसान होऊ शकते. यासाठी केवळ विशेष प्रकारच्या ग्लासने बनविलेला चष्मा सुरक्षित मानला जातो. पूर्णतः एक्सपोस केलेली ब्लॅक अँड व्हाईट कॅमेरा रीळ किंवा ऑफसेट प्रिंटिंगमध्ये वापरलेली फिल्म वापरली जाऊ शकते. 14 वोल्ट किंवा सोलर फिल्टर फिल्म देखील सूर्यग्रहण पाहण्याचा एक सुरक्षित मार्ग आहे. सूर्यग्रहण दीर्घकाळ पाहू नका. काही सेकंद पाहून पापण्या मिटवा. सूर्यग्रहणादरम्यान घराबाहेर पडण्याचा कोणताही धोका नाही. हे संपूर्ण सूर्यग्रहण आपल्या वैज्ञानिक ज्ञानाच्या भांडारातील अनेक अनुत्तरीत प्रश्न शोधण्यात उपयुक्त ठरेल.

घटनेचे महत्त्व :
दिवसा अंधार होण्याच्या नैसर्गिक घटनेला जरी काही लोक धोकादायक मानत असले, तरी शास्त्रज्ञांना बरेच काही शोधण्याची संधी आहे. सूर्य हा एक आगीचा गोळा आहे, ज्यामध्ये 90 टक्के हायड्रोजन, हीलियम आणि काही इतर गॅस आहेत. त्याचा प्रकाश आणि उष्णता 93 लाख मैलांचा प्रवास करून पृथ्वीवर पोहोचते. सूर्याच्या हालचालींविषयी माहिती मिळविण्यासाठी एक अचूक वेळ असते, ते म्हणजे पूर्ण ग्रहण. कारण या काळात सूर्याची तीव्रता सर्वात कमी असते. 18 ऑगस्ट 1868 रोजी एका संपूर्ण सूर्यग्रहणादरम्यान, पियरे ज्युलस जॉनसन नावाचे वैज्ञानिक मोठ्या अडचणीत भारतात आले आणि त्यांनी अशी माहिती गोळा केली, ज्याच्या आधारावर ब्रिटीश खगोलशास्त्रज्ञ लाक्वियरने सूर्यावरील हीलियमच्या अस्तित्वाची पुष्टी केली. तीन दशकांनंतर, पृथ्वीवर हीलियम सापडला.