देशात प्रथमच आढळला रंग बदलणारा दुर्मिळ विषारी ‘स्कॉर्पिओन’ मासा

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – सेंट्रल मरीन फिशरीज इन्स्टिट्यूट (सीएमएफआरआय) च्या वैज्ञानिकांनी एक दुर्मिळ मासा शोधला आहे. हा मासा केवळ त्याचा रंग बदलत नाही तर ती अतिशय विषारी देखील आहे. पहिल्यांदाच भारतीय पाण्याचा स्रोतामध्ये अशा माशाचा शोध लागला आहे. या माशाचे नाव स्कॉर्पिओन फिश आहे. स्कॉर्पिओनफिशचे शास्त्रीय नाव स्कॉर्पिओनोस्पिसिस नेगेलिक्टा आहे.

हा मासा शिकार करताना वेळ आणि बचाव करताना आपला रंग बदलू शकतो. यासोबतच, त्याच्या पाठीच्या कण्यामध्ये विष आहे. जर त्याला काळजीपूर्वक पकडले नाही तर त्याच्या विषामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.

सीएमएफआरआय वैज्ञानिक डॉ. आर. जयाबास्करन म्हणाले की, या माशाच्या मणक्यात सापडलेले विष न्यूरोटॉक्सिक आहे. जर ते मानवी शरीरात गेले तर त्यामुळे भयंकर वेदना होतात. आम्हाला हा मासा समुद्र गवत रंगात बदललेला आढळला. मन्नारच्या आखातीमध्ये अशा प्रकारचा पहिला मासा सापडला आहे. डॉ.ज्याबास्करन म्हणाले की, प्रथमच आम्ही पाहिले तर हा मासा गवतात लपलेला होता. त्यानंतर तो कोरल स्केलेटोनसारखा दिसत होता. हा मासा आहे की जीवाश्म कोरल स्केलेटन आहे हे समजू शकले नाही. चार सेकंदानंतर, माशाने आपल्या शरीरावर रंग काळा बदलला. तेव्हा समजले की ही एक दुर्मिळ स्कॉर्पिओन फिश आहे.

डॉ. जयाबास्करन यांनी सांगितले की, हा मासा रात्री समुद्रात जाऊन शिकार करतो. तो आपला शिकार जवळ येण्याची प्रतिक्षा करतो. त्याचा सेन्सर ऑर्गन खूप वेगवान आहे. शिकार जवळ येताच तो वेगाने त्यांच्यावर अटॅक करतो.

हा मासा 10 सेमी अंतरावरुन लहान जीवांना खातो. बहुतेक ज्ञानेंद्रिय त्याच्या शेपटीतच असतात. तसेच, त्याच्या शेपटीवर गडद डाग असतात, म्हणून काही लोक याला बॅन्डटेल स्कॉर्पिओन फिश म्हणतात. डॉ आर. जयाबास्करन म्हणाले की, या क्षणी आम्ही हा मासा राष्ट्रीय सागरी जैवविविधता संग्रहालयात पाठविला आहे, जेणेकरून त्याबद्दल अधिक अभ्यास करता येईल. करंट सायन्स या जर्नलमध्ये या माशाविषयी वैज्ञानिक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.