अप्रतिम ! भारतात 118 वर्षानंतर आढळली ऑर्किडच्या फुलांची दुर्मिळ प्रजाती Eulophia obtusa

बरेली : पोलीसनामा ऑनलाइन –  भारतात 118 वर्षानंतर ऑर्किड फुलांची दुर्मिळ प्रजाती सापडली आहे. उत्तर प्रदेशच्या दुधवा टायगर रिझर्व्हमध्ये वन अधिकार्‍यांना आणि वन्यजीव तज्ज्ञांना निरीक्षणाच्या दरम्यान Eulophia obtusa ची फुले आढळली आहेत, ज्यांना ग्राऊंड ऑर्किड म्हणूनही ओळखले जाते.

आयुसीएन रेड लिस्टमध्ये विलिप्तप्राय लिस्टेड वनस्पतीची ही प्रजाती शेवटची पीलीभीतमध्ये 1902 मध्ये आढळली होती. इंग्लंडमध्ये क्यू हर्बेरियमच्या कागदपत्रांमध्ये या गोष्टींची नोंद आहे. 19व्या शतकात गंगा नदीच्या मैदानी परिसरातून वैज्ञानिक ही प्रजाती येथे घेऊन आले होते. परंतु, मागील 100 वर्षांपासून ती पुन्हा येथे आढळली नव्हती.

ऑर्किडच्या या दुर्लभ प्रजातीला शोधणार्‍या पथकातील फील्ड डायरेक्टर संजय पाठक यांनी सांगितले की, आम्हाला 30 जूनरोजी ही फुले दिसली. आम्ही फोटो काढून बांगलादेशचे बॉटनिस्ट मोहम्मद शरीफ हुसैन सौरव यांना पाठवले, जे सध्या जर्मनीमध्ये रिसर्च करत आहेत. त्यांनी दुजोरा दिला की, हे Eulophia obtusa च आहे.

पाठक म्हणाले, दुधवा फॉरेस्ट रेंजमध्ये ही प्रजाती दोन वेगवेगळ्या ठिकाणी आढळली आहे. ती आणखीकाही ठिकाणी आढळण्याची शक्यता आहे. वर्ल्ड वाईल्ड फंड फॉर नेचर (डब्ल्यूडब्ल्यूएफ) भारतचे को-ऑर्डिनेटर डॉक्टर मुदित गुप्ता यांनी सांगितले की, लवकरच डिटेल सर्वे केला जाऊ शकतो.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like