Kandivali : चारकोपच्या रहिवाशी परिसरात आढळला दुर्मिळ प्रजातीचा ‘दुतोंड्या’ साप

मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन- एक दुर्मिळ प्रजातीचा 3 फुटाचा साप (rare-species-red-sand-boa-snake) कांदिवलींच्या सेक्टर ८ परिसरातील चारकोप वेदांत ( charkop-resident-area-kandivali) या सोसायटीमध्ये आढळल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली. साप आढळताच लोकांनी सर्पमित्रांना फोन करून बोलावले. सर्पमित्र अजिंक्य पवार यांनी या सापाला पकडून वन विभागाच्या स्वाधीन केले.

सापांच्या सर्व प्रजातींमधील जमिनीवरील सर्पांतील लाजाळू व शांत स्वभावाचा हा साप आहे. मंद हालचाल, जाडसर शरीर, शेपटी व तोंडात जवळपास साम्य वाटत असल्याने याला दुतोंड्या असे नाव आहे. लालसर तोंड व शेपटी आखूड, डोळे लहान, बाहुली उभी, जमिनीत राहणारा, तोंड शरीराच्या मानाने बारीक असल्याने तो मातीत, वाळूत सहज शिरू शकतो. भक्ष्याभोवती विळखा घालून भक्ष्याचा जीव गेल्यावर भक्ष्य गिळतो अशी या सापाविषयी माहिती अजिंक्यने सांगितली. सर्पमित्राने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील वनक्षेत्रपाल विजय बाराते (RFO)यांच्या निदर्शनाखाली कार्यरक्षक वैभव पाटील प्राणी मित्र किरण रोकडे यांच्याकडे सापाला स्वाधीन केले.