सोनेरी रंगाचा कासव अन् विष्णूचा अवतार म्हणून दर्शनासाठी रांगाच रांगा !

काठमांडू : वृत्तसंस्था – आतापर्यंत आपण अनेक दुर्मिळ जातीचे कासव पाहिले असतील. मात्र, नेपाळमध्ये एक असा कासव आढळून आला आहे. ज्याचा रंग पाहून तो सोन्याचा असल्यासारखे वाटते. सध्या या कासवाच्या दर्शनासाठी लोकांनी रांगा लावल्या आहेत. हे कासव इतर कसवांपेक्षा वेगळे असून हे कासव विष्णू देवाचा अवतार असल्याच्या श्रद्धेतून लोकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. तर मिथिला वाइल्डलाइफ ट्रस्टने हे कासव भारतीय प्लॅप कासव वर्गातील असल्याचे म्हटले आहे.

सोनेरी कासव आढळल्यानतर वन्यजीव तज्ज्ञ कमल देवकोटा यांनी सांगितले की या कासवाला नेपाळमध्ये विशेष सांस्कृतिक धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. त्यांनी सांगितले की, हे कासव विष्णू देवाचा अवतार आहे. पृथ्वीला वाचवण्यासाठी त्यांनी कासव रुपात अवतार घेतला आहे. हिंदू धर्मातील मान्यतेनुसार, कासवाच्या कवचाच्या वरील भागाला आकाश आणि खालील भागास पृथ्वी समजले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

हे दुर्मीळ जातीचे कास धनुष जिल्ह्यातील धनुषधाम नगरपालिका भागात आढळून आले. नेपाळमध्ये सोनेरी रंगाचा हा पहिलाच कासव आहे. सगळ्या जगात अशाप्रकारचे फक्त पाच कासव आहेत. आमच्यासाठी हा महत्त्वाचा शोध असल्याचे देवकोटा यांनी सांगितले.
तर दुसरीकडे तज्ज्ञांच्या मते, कासवांच्या जनुकीय बदलांमुळे कासवाचा रंग सोनेरी झाला असल्याची माहिती त्यांनी दिली. त्याला क्रॉमेटिक ल्यूसिझम असे म्हणतात. त्यामुळे कासवाचा वरील भाग सोनेरी होतो. सध्या या कासवाची नेपाळमध्ये चर्चा असून वन्यजीव अभ्यासकांकडून या कासवाचे निरिक्षण, अभ्यास सुरु आहे. दरम्यान, अशाच रंगाचे कासव ओडीशामध्ये जुलै महिन्यात आढळून आले होते. बालेश्वर जिल्ह्यातील साजनपूर गावात हे कासव आढळून आले आहे.