राधाकृष्ण विखे पाटील लवकरच येणार भाजपमध्ये, ‘या’ मंत्र्याचे संकेत

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – विरोधी पक्ष नेते पदाचा राजिनामा दिल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील कोठे जाणार याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत असतानाच मुख्यमंत्र्यांच्या सभेत एका मंत्र्याने विखे पाटील भाजपात येणार असल्याचे संकेत दिले आहेत. जलसंवर्धन मंत्री राम शिंदे यांनी हे संकेत दिले असून ते श्रीरामपूर येथील सभेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल आपल्या विरोधी पक्ष नतेपदाचा राजिनामा दिला. पक्षश्रेष्ठींनी तो मंजूर देखील केला आहे. यावर अशोक चव्हाण म्हणतात की ते विखेंचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसऱ्या बाजुला त्यांचे चिरंजीव म्हणतात की मी वडिलांना भाजपात आणणार असल्याचे बोलत आहेत.

यावेळी बोलताना राम शिंदे यांनी राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले. अशोक चव्हाण त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न करत आहेत तर सुजय विखे हे वडीलांना भाजपात आणणार असल्याचे सांगत आहेत. आता मी या जिल्ह्याचा पालक मंत्री या नात्याने पाहणार आहे की अशोक चव्हाण आणि सुजय विखेंमध्ये कोण जास्त प्रयत्न करते.

मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस पक्षावर निशाणा साधताना म्हणाले, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे स्वागत ज्या पद्धतीने होत आहेत तसे स्वागत त्यांचे कोठेही झाले नसेल. राहुल गांधी येण्याआधीच विरोधी पक्ष नेत्याने पद सोडले. जिल्हाध्यक्षाने पद सोडले. यावरून असे वाटतेय की राहुल गांधी आल्यानंतर नगर काँग्रेस कमिटी बंद. आमची कोठेही शाखा नाही, आता जिल्ह्यात काँग्रेस नाही. अशा पद्धतीने राहुल गांधी यांचे स्वागत कोठेही झाले नसेल.