Coronavirus : ‘कोरोना’ चा प्रसार वाढत असताना गोव्यात डान्स करताना दिसली अभिनेत्री रश्मी देसाई (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – एकीकडे कोरोना व्हायरसची दहशत वाढत आहे अशात बिग बॉस 13 ची स्पर्धक आणि नागिन 4 या मालिकेची अभिनेत्री रश्मी देसाई हिचा एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. असा दावा केला जात आहे की, रश्मीचा हा व्हिडीओ गोव्यात आयोजित करण्यात आलेल्या एका इव्हेंमधील डान्स परफॉर्मंसचा आहे.

एका इंग्रजी वृत्तानुसार, रश्मी देसाई अलीकडेच गोव्यातील एका इव्हेंटमध्ये डान्स परफॉर्मंस करताना स्पॉट झाली. यात असाही दावा केला आहे की, तिनं ऑडियंससमोर लाईव्ह परफॉर्मंस दिला आहे. रश्मीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर झपाट्यानं व्हायरल होताना दिसत आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर रश्मी पिंक कलरच्या आउटफिटमध्ये दिसत आहे. तिच्या समोर अनेक लोकं बसलेली दिसत आहेत जी तिचा डान्स पहात आहेत.

https://www.instagram.com/p/B900v4BhtzE/

रश्मीनं तिच्या कोणत्याही सोशल अकाऊंटवरून मात्र तिच्या गोव्यातील या इव्हेंटचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळं आम्ही या डान्स व्हिडीओची पुष्टी करत नाही. यावर अद्याप रश्मी देसाईची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. यावर आता रश्मी देसाई नेमकं काय म्हणेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

https://www.instagram.com/p/B90sUqmBpUg/