Rashifal 2021 : नवीन वर्षातील 5 भाग्यशाली राशी, कुणाचे चमकणार नशीब जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन –  2021 अनेक राशींसाठी आनंदाचा काळ घेऊन येणार आहे. ज्योतिषतज्ज्ञांनुसार, 2021 मध्ये पाच राशींचे लोक खुपच भाग्यशाली असतील. कर्क, सिंह, कन्या, धनु आणि मीन राशींसाठी नवे वर्ष अनेक बाबतीत लाभदायक ठरणार आहे. या राशींमध्ये धन आणि उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील, कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण राहील. 2021 मध्ये सर्व 12 राशींची स्थिती कशी असणार आहे, ते जाणून घेवूयात.

मेष
2021 मध्ये मेष राशीवाल्यांना करियरमध्ये चांगली फलप्राप्ती होईल. तसेच आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. सुरूवातीच्या काळात स्थिती डळमळीत होईल. जानेवारी-फेब्रुवारी नोकरदार जातकांना सावधगिरी बाळगावी लागेल. तुमच्या कर्म भावाचे स्वामी शनिदेव अस्थिर राहतील. मात्र, व्यापर करणार्‍यांसाठी काळ चांगला आहे. उत्पन्न वाढवण्याच्या अनेक संधी मिळतील. आई-वडिलांना आरोग्यसंबंधी समस्या होऊ शकतात. सप्टेंबर ते नोव्हेंबरदरम्यान आर्थिक तंगीला तोंड द्यावे लागेल. विद्यार्थ्यांसाठी जानेवारी, मार्च, मे, जुलै आणि नोव्हेंबरचा काळ खुपच अनुकूल राहील, तर फेब्रुवारी, एप्रिल, जून, ऑगस्ट, सप्टेंबर आणि डिसेंबरमध्ये तुम्हाला सावध राहावे लागेल.

वृषभ
2021 मध्ये नोकरदार लोकांना पदोन्नती आणि प्रगतीचा लाभ मिळेल. कार्यक्षेत्रात चांगले काम करण्याची संधी मिळेल. परंतु व्यापारी वर्गासाठी, आर्थिक जीवन थोडे कमी चांगले असेल. आर्थिक तंगी येऊ शकते. ग्रहांची स्थिती दर्शवते की विद्यार्थ्यांसाठी वेळ थोडा कठीण आहे. चांगले परिणाम मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. याशिवाय कौटुंबिक आनंदात घट होऊ शकते. वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. मानसिक ताण वाढेल. आरोग्याच्या दृष्टीने काळ चिंताजनक आहे, कारण राहू-केतुची उपस्थिती आरोग्यास नुकसान पोहचवू शकते.

मिथुन
पुढच्या वर्षी करियरमध्ये खूप चढ-उतारांचा सामना करावा लागू शकतो. नोकरदार जातकांना सहकार्‍यांकडून मदत न मिळाल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागेल. पदोन्नती आणि मोठ्या लाभासाठी सध्या प्रतीक्षा करावी लागेल. व्यावसायिकासाठी काळ चांगला असेल. मोठे व्यवहार करताना विशेष काळजी घ्या. वर्षाची सुरुवात आर्थिक जीवनासाठी चांगली राहील. दरम्यान काही समस्या असू शकतात. वर्षाच्या मध्यात पैशाचे नुकसान होण्याचे योग आहेत. यावर्षी विद्यार्थ्यांना मेहनत आणि प्रयत्नांनंतरच यश मिळेल.

कर्क
कर्क राशीच्या जातकांना करियरमध्ये वेग पकडण्याची संधी मिळेल. प्रगती आणि पदोन्नती देखील शक्य आहे. व्यावसायिकांना गुंतवणूकीसाठी हे वर्ष खूप यशस्वी ठरणार आहे. मेहनतीच्या बळावर प्रत्येक समस्येतून बाहेर पडण्यात यशस्वी ठराल. विद्यार्थ्यांसाठी वर्ष चांगले आहे. यावर्षी त्यांना त्यांचा प्रत्येक विषय समजून घेण्यात यश मिळेल. एखाद्या मोठ्या निर्णयामुळे कुटुंबिय आपल्या विरोधात उभे असल्याचे दिसून येईल. प्रेमसंबंधासाठी 2021 खूप चांगले आहे. आरोग्याच्या बाबतीत सावधगिरी बाळगावी लागेल.

सिंह
सिंह राशीचे जातक शत्रूंवर अधिराज्य गाजवतील. वेळेवर सर्व कामे पूर्ण करण्यात यश मिळेल. आर्थिक जीवनात काही खर्च वाढतील, परंतु कोठेही पैशांची कमतरता भासणार नाही. अडकलेले पैसे परत मिळतील. कर्जातून मुक्ती मिळेल. ज्या विद्यार्थ्यांना परदेशात जाण्याची इच्छा आहे त्यांना बरेच प्रयत्न केल्यानंतर यश मिळेल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल आणि ते व्यावसायिक जीवनात यशस्वी व्हाल. जर आपण अद्याप अविवाहित असाल तर या वर्षी एखाद्या विशिष्ट व्यक्तीस भेटू शकता.

कन्या
नोकरी आणि करियरच्या बाबतीत 2021 वर्ष सामान्य आहे. जे व्यवसाय करतात त्यांच्यासाठी काळ चांगला आहे. व्यवसायातील भागीदारीत फायदा होईल. ग्रह आणि नक्षत्रांच्या प्रभावामुळे आर्थिक जीवनात काही अडचणी येऊ शकतात. परंतु राहुची शुभ दृष्टी शुभ फळ देत पैसे कमावण्याच्या अनेक संधी संधी देईल. विद्यार्थ्यांना अधिक मेहनत घ्यावी लागेल. विवाहीतांना जोडीदाराच्या मदतीने कार्यक्षेत्रात फायदा होईल. आरोग्याच्या दृष्टीकोनातून हे वर्ष चांगले आहे. धाडस आणि शक्तीत वाढ होईल.

तुळ
तूळ राशीच्या व्यक्तींना करियरमध्ये अनुकूल परिणाम मिळतील. व्यवसाय करत असलेल्या जातकांना एखाद्या गुप्त स्त्रोतातून धनलाभ होईल. धार्मिक कार्यात सक्रियपणे सहभागी व्हाल. विद्यार्थ्यांसाठी या वर्षाचा मध्य सर्वोत्कृष्ट असेल. यावेळी विद्यार्थी उत्कृष्ट कामगिरी करतील. संततीसाठी काळ चांगला आहे. प्रेमसंबंधासाठी वर्ष चांगले आहे. लव्ह मॅरेजचे योग आहेत. आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल.

वृश्चिक
यावर्षी करिअरमध्ये अनेक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. कार्यक्षेत्रात जास्त मेहनत करावी लागेल. व्यवसाय करणार्‍यांची आर्थिकस्थिती चांगली राहील. परंतु अचानक खर्च वाढल्याने अडचणी वाढू शकतात. नोकरीची तयारी करणार्‍या जातकांना यावर्षी चांगली बातमी मिळू शकते. संततीची बाजू चांगली असेल. मुलांशी संबंध सुधारतील. आरोग्याच्या बाबतीत पाहिले तर या वर्षात अचानक एखादा रोग विशेष त्रास देऊ शकतो.

धनु
व्यवसायातील लोकांसाठी हे वर्ष उत्तम आहे. व्यवसायात त्यांना अपार यश मिळेल. त्यांची आर्थिकस्थिती मजबूत राहील. परंतु नोकरदारांसाठी स्थिती सामान्य राहील. यावर्षी विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये यश मिळेल. परदेशात जाऊन अभ्यास करण्याची संधी मिळेल. छोटी भावंडे तुम्हाला आधार देताना दिसतील. जोडीदाराचे आरोग्य बिघडल्यामुळे जीवनात तणाव वाढेल. 2021 प्रेमी युगलांसाठी रोमँटिक क्षण घेऊन येईल.

मकर
करिअरमध्ये मेहनत केल्यावरच चांगले परिणाम मिळतील. नोकरदारांना सामान्य सामान्य परिणाम मिळतील. हे वर्ष व्यापार्‍यांसाठी शुभ ठरणार आहे. आर्थिक जीवनात सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये त्रास होईल, परंतु नंतर पैशांची घेवाण-देवाण आर्थिक संकट दूर करेल. विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळतील. 2021 मध्ये आईला आरोग्याचा त्रास होऊ शकतो. घरात आनंदाचा अभाव असेल. वैवाहिक जीवनात कंटाळा जाणवेल.

कुंभ
करियरच्या बाबतीत 2021 आपल्यासाठी चांगले नाही. विशेषतः मध्यानंतरचा काळ प्रतिकूल असेल. आर्थिक जीवनात खर्चात अचानक वाढ होईल आणि यामुळे काही काळ आर्थिक तंगी जाणवेल. व्यापार्‍यांना कामानिमित्त प्रवास करण्याची संधी मिळेल. जोडीदाराकडून मदतीची अपेक्षा करू शकता. यावर्षी आरोग्य जीवन कमजोर राहू शकते.

मीन
करियार या काळात वेग पकडेल. व्यापार्‍यांना बिझनेसचा विस्तार करण्याची संधी मिळेल. आर्थिक जीवनात उत्पन्नाचे स्रोत वाढतील. काही खर्च देखील वाढतील. कौटुंबिक जीवन चांगले राहील. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळेल. जोडीदाराशी संबंध चांगले राहतील. संततीला अभ्यास अधिक चांगला करण्याची संधी मिळेल. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीसोबत मिळून एखादा मोठा निर्णय घेऊ शकता. लव्ह मॅरेजचे योग आहेत. आरोग्यासाठी हे वर्ष विशेष उत्तम आहे.