Rashifal 2022 | वार्षिक राशिफळ 2022 ! मेषपासून मीन राशीपर्यंत ‘नशीबाचे कनेक्शन’, जाणून घ्या कसे असेल तुमचे ‘नवीन वर्ष’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Rashifal 2022 | प्रत्येकाला वाटते की नवीन वर्ष आपल्यासाठी शुभ ठरावे, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळावे, नवीन वर्षात प्रेमजीवन, आर्थिक जीवन, करिअर, आरोग्य जीवन चांगले जावे. नवीन वर्ष काही राशींसाठी खूप छान ठरणार आहे, तर काहींसाठी अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सर्व 12 राशींचे 2022 चे राशिफळ जाणून घेवूयात. (Rashifal 2022)

 

1. मेष (Aries) :
नवीन वर्ष नवीन बदल घेऊन येईल. या वर्षी सर्व कामे पूर्ण होतील. करिअरमध्ये सुवर्ण यश मिळेल. मेहनतीचे अपेक्षित फळ मिळेल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याची दाट शक्यता आहे, मग ते शिक्षण असो किंवा नोकरी किंवा व्यवसाय. या वर्षी धनप्राप्ती तसेच धनसंचय करण्यात यशस्वी व्हाल.

 

2. वृषभ (Taurus) :
या राशीच्या लोकांसाठी हे वर्ष खूप चांगले जाण्याची शक्यता आहे. प्रत्येक गोष्टीत यश मिळेल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. रखडलेली कामे होतील. गुंतवणुकीसाठीही हे वर्ष चांगले आहे. व्यवसायातही यश मिळण्याची दाट शक्यता आहे. अचानक अनेक धनलाभ होईल. (Rashifal 2022)

 

3. मिथुन (Gemini) :
नवीन वर्ष संमिश्र आहे. आर्थिक बाबतीत यश मिळेल. नवीन लोकांशी संपर्क होईल. एप्रिलपासून व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. यावेळी महत्त्वाचे निर्णय घ्याल. उत्पन्न वाढू शकते. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या.

 

4. कर्क (Cancer) :
नवीन वर्षाच्या सुरुवातीला काही आव्हाने येऊ शकतात. मात्र, काही काळानंतर गोष्टी तुमच्याबाजूने वळतील. एप्रिल महिन्यात करिअरच्या विकासावर लक्ष केंद्रित कराल. व्यवसायात वाढ होईल. नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे.

5. सिंह (Leo) :
नवीन वर्षात एक वेगळा उत्साह दिसून येईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. मेहनतीचे योग्य फळ मिळेल. उत्पन्न वाढवण्यात यशस्वी व्हाल.

 

6. कन्या (Virgo) :
हे वर्ष कन्या राशीच्या लोकांसाठी मोठ्या आशा घेऊन आले आहे. या वर्षी मेहनतीचे फळ मिळेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांचे स्वप्न पूर्ण होईल. प्रतिभा दाखवण्याची पूर्ण संधी मिळेल. नोकरीच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल.

 

7. तूळ (Libra) :
तूळ राशीच्या लोकांना नवीन वर्षात प्रत्येक कामात यश मिळण्याची अपेक्षा आहे. पैसे कमवण्यात तसेच त्यात भर घालण्यात यशस्वी व्हाल. उत्पन्नात वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

 

8. वृश्चिक (Scorpio) :
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष संमिश्र जाण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी नोकरदार लोकांची कामगिरी उत्कृष्ट राहील. या वर्षात मोठे यशही मिळवू शकता. लव्ह लाईफसाठी हे वर्ष चांगले आहे. एकापेक्षा जास्त माध्यमातून पैसे कमावू शकाल.

9. धनु ( Sagittarius) :
धनु राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष चांगले आहे. या वर्षी खूप प्रवास करावा लागू शकतो.
ज्यामधून पैसे मिळण्याचीही शक्यता आहे. सामाजिक आणि धार्मिक कार्यात खूप रस घ्याल.
मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल असे दिसते. प्रत्येक कामात कुटुंबातील सदस्य आणि मित्रांकडून भरपूर सहकार्य मिळेल. पगार वाढू शकतो.

 

10. मकर (Capricorn) :
मकर राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष अनुकूल राहील. वर्षाच्या पहिल्या तिमाहीत आनंदी जीवन जगाल.
परंतु एप्रिलपासून काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
या काळात कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या, अन्यथा भविष्यात नुकसान होऊ शकते.

 

11. कुंभ (Aquarius) :
कुंभ राशीच्या लोकांसाठी जानेवारी आणि फेब्रुवारी हे दोन महिने खूप चांगले आहेत. मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल.
प्रेमसंबंधात गोडवा राहील. जोडीदारासोबत सहलीला जाऊ शकता. आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

 

12. मीन (Pisces) :
मीन राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष चांगले राहील. यापुढे कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.
आरोग्याबाबत जागरूक राहण्याची गरज आहे. घर किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार असेल.

 

 

Web Title :- Rashifal 2022 | rashifal 2022 according to the yearly horoscope 2022 how will this new year be for all zodiac signs know

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Suman Kale Death Case | सुमन काळे पोलीस कोठडी मृत्यू! सक्षम व निष्पक्ष सरकारी वकिल नेमणेबाबत राज्यपालांना निवेदन

 

Pune Police Cricket Tournament | पुणे शहर पोलीस क्रिकेट स्पर्धेत लोणी काळभोर पोलीस ठाण्याला विजेतेपद

 

Gold Price Today | सोने-चांदी खरेदीदारांसाठी खुशखबर ! सोने सर्वोच्च स्तरापासून 9512 रुपये स्वस्त