शिवसेनेत ‘इनकमिंग’ ! निर्मला गावित आणि रश्मी बागल शिवबंधनात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती काही केल्या थांबायचे नाव घेत नाहीये.तर शिवसेनेमध्ये सध्या जोरदार इनकमिंग सुरु आहे. काँग्रेसच्या माजी आमदार निर्मला गावित आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या रश्मी बागल यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. निर्मला गावित यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत दोघींनी हातामध्ये शिवबंध बांधत शिवसेनेत प्रवेश केला.

निर्मला गावित या इगतपुरी मतदार संघामध्ये दोन वेळा काँग्रेसच्या आमदार राहिल्या आहेत. निर्मला गावित या सलग नऊ वेळा नंदूरबार मतदार संघामध्ये खासदार राहिलेले माणिकराव गावित यांच्या कन्या आहेत. काँग्रेसचा हात सोडत गावित यांनी आता धनुष्यबाण हातात घेत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

रश्मी बागल यांचे वडील दिंगबर बागल हे करमाळ्याचे अपक्ष आमदार होते. १९९४ मध्ये युती सरकारला त्यांनी पाठिंबा दिला होता. त्यावेळी ते राज्यमंत्रीही होते. त्यांच्या निधनानंतर रश्मी यांच्या आई या 2009 ला राष्ट्रवादीच्या आमदार होत्या. २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या नारायण पाटील यांनी रश्मी बागल यांचा काही मतानी त्यांचा पराभव केला होता. आगामी विधानसभेच्या निवडणूका लक्षात घेऊन बागल यांनी हातात शिवबंधन बांधण्याचा निर्णय घेत उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी दिग्वीजय बागल उपस्थीत होते.

राज्यातील विरोधी पक्षात असलेले अनेक दिग्गज नेते सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करनार असल्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

आरोग्यविषयक वृत्त