शिवसेनेत प्रवेश केलेल्या रश्मी बागल यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर केला ‘हा’ गंभीर आरोप

करमाळा : पोलीसनामा ऑनलाइन – पक्ष नेतृत्वाकडून कामाची कदर होत नसल्याचा आरोप करत करमाळ्याच्या रश्मी बागल यांनी शिवसेनेत प्रवेश केला. रश्मी बागल यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वार आरोप करून शिवबंधन बांधले. त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा-शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरु झाले असून अनेक कांग्रेस, राष्ट्रवादीचे नेते खुंटलेल्या विकासाचा मुद्दा पुढे करत पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत.

काही दिवसांपूर्वी रश्मी बागल यांचे बंधू दिग्विजय बागल यांनी फेसबूकवर ‘आता शिवबंधन बांधण्याची वेळ आली’ अशी पोस्ट टाकली होती. सोशल मीडियावर शिवसेनेच्या प्रवासाचे फोटो व्हायरल केले होते. सोशल मीडियावर व्हायल झालेल्या फोटेमध्ये शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, तानाजी सावंत, स्वर्गीय दिगंबर बागल, रश्मि बागल आणि दिग्विजय बागल यांचे फोटो आहे. या फोटो खाली ‘आता शिवबंधन बांधूया हाती,’ असा मजकूर लिहण्यात आला आहे.

कोण आहेत रश्मी बागल ?

करमाळ्याचे स्वर्गीय आमदार दिगंबर बागल यांच्या त्या कन्या आहेत. दिगंबर बागल यांचे अकाली निधन झाल्यानंतर त्यांच्या जागी पत्नी शामल बागल यांना राष्ट्रवादीने २००९ मध्ये उमेदवारी दिली. दिगंबर बागल हे शरद पवारांचे निष्ठावंत समजले जात. त्यामुळेच त्यांना मंत्रीमंडळातही घेण्यात आले होते. २००९ साली माढा तालुक्यातील ३६ गावे करमाळा विधानसभेला जोडण्यात आली. राष्ट्रवादीने रश्मी बागल यांना २००० साली उमेदवारी दिली मात्र त्यांचा केवळ २५३ मतांनी पराभव झाला. सध्या त्यांच्याकडे मकाई आणि आदिनाथ साखर कारखाने आणि करमाळा कृषी उत्पन्न बाजार समीती आहे. दिगंबर बागल यांचे वारस म्हणून रश्मी बागल यांच्याकडे पाहिले जाते. रश्मी बागल या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांपैकी मानल्या जातात.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like