‘क्लीव्हेज’वरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री रश्मी देसाईनं दिलं जोरदार ‘प्रत्युत्तर’, म्हणाली…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  बिग बॉस 13 ची एक्स स्पर्धक आणि उतरन या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रश्मी देसाई बिग बॉस 13 मधील चर्चित स्पर्धकांपैकी एक आहे. बिग बॉस 13 चा विनर सिद्धार्थ शुक्ला आणि तिचं नातं, तसेच याच शोचा एक्स स्पर्धक अरहान खान सोबतचं तिचं अफेअर खूप चर्चेत राहिलं होतं. याशिवाय रश्मी आपल्या ड्रेसिंग स्टाईलमुळं ट्रोल झाल्यानंही काही वेळा चर्चेत आली आहे. रश्मी देसाईनं आता ट्रोलर्सना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

https://www.instagram.com/p/B9eHjSFgRsZ/

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत ट्रोलर्सवर निशाणा साधताना रश्मी देसाई म्हणाली, “मला माझी साईज, कपडे, केस, मेकअप आणि लो क्लीव्हेजवरून अनेकदा ट्रोल केलं गेलं आहे. मी अशा लोकांपैकी आहे ज्यांचं वजन सतत कमी-जास्त होत असतं. लोकांनाआता या गोष्टीचा प्रॉब्लेम आहे. अनेकदा लोकांना माझा डान्स आणि माझे कपडे आवडत नाही.”

पुढे बोलताना रश्मी म्हणाली, “मला सतत ट्रोल करणाऱ्यांना मला एकच सांगायचं आहे की, माझं शरीर आहे. माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन जे मला योग्य वाटतं. कारण यावर फक्त माझा हक्क आहे.”

अभिनेता आणि अभिनेत्रींमधील मानधनाच्या मुद्द्यावर बोलताना रश्मी म्हणते, “जर अभिनेत्याला जास्त पैसे मिळत असतील तर ती त्याची मेहनत आहे. मी त्यावर प्रश्न उपस्थित करू शकत नाही. ज्याच्यावर माझा हक्क आहे मला तेच मिळतंय.”

https://www.instagram.com/p/_302tjCvHN/

https://www.instagram.com/p/B8a8t4Kg4-S/

https://www.instagram.com/p/B8Di6x4gxeg/

https://www.instagram.com/p/B70xEBmgXnq/

https://www.instagram.com/p/B8tO8c7BTNp/