रश्मी देसाई ‘नागिन 4’ मधून OUT होणार ! मेकर्सनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय, जाणून घ्या कारण

पोलीसनामा ऑनलाइन – बिग बॉस 13 ची स्पर्धक आणि नागिन 4 या मालिकेची अभिनेत्री रश्मी देसाई सध्या चर्चेत येताना दिसत आहे. आता जी माहिती समोर आली आहे ती वाचल्यानंतर कदाचित तिचे चाहते नाराज होतील. अशी माहिती आहे की नागिन 4 मध्ये शलाकाची भूमिका साकारणाऱ्या रश्मी देसाईला शोच्या मेकर्सनं आता बाहेराचा रस्ता दाखवला आहे. रश्मी आता या मालिकेचा हिस्सा नाही.

असं सांगितलं जात आहे की, शोचे निर्माते आता नागिन 4 चं बजेट कमी करू इच्छित आहेत. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळं झालेल्या नुकसानीनंतर आता हे पाऊल टाकण्यात येत आहे. रश्मी देसाई नागिन 4 मध्ये काम करण्यासाठी मोठी रक्कम घेत होती. आता लॉकडाऊननंतर मात्र मकर्स सीरियलवर एवढा खर्च करण्यास तयार नाहीत. त्यामुळंच आता रश्मी देसाईला नागिन 4 मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

रश्मी देसाईलाही याबाबत माहिती देण्यात आली आहे. रश्मी देसाई मालिकेसाठी काही सीन करेल आणि नंतर तिचा रोल संपवला जाईल. आणखीही काही कलाकार आहेत ज्यांना मेकर्सनं बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

महाराष्ट्रातील सद्य स्थिती पाहता वेळेवर शुटींग होणं अवघड आहे. मेकर्सला सेटचा मेंटेनंस खर्च करणंही अवघड झालं आहे. एका इंग्रजी वृत्तानुसार मेकर्सनं असाही निर्णय घेतला आहे की, नागिन 4 ही मालिका आता इथंच संपवावी आणि नव्या सीजनचा विचार करावा. मेकर्स सांगतात की, चौथ्या सीजनकडून अपेक्षे प्रमामे परिणाम पहायया मिळाले नाहीत. रश्मीनं फक्त शोचं बजेट वाढवलं टीआरपी नाही. आता रश्मी आणि विजेंद्र यांची भूमिका संपवण्यात येणार आहे.