खूपच गरीबीत गेलंय रश्मी देसाईचं ‘बालपण’ ! डान्स क्लासच्या फीसाठी आईकडं नव्हते 350 रुपये

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड स्टार रश्मी देसाई आज इंडस्ट्रीतील मोठं नाव आहे. परंतु इथं पोहोचण्यासाठी तिनंही प्रचंड मेहनत घेतली. याचा खुलासा तिनं बिग बॉस 13 मध्ये देखील केला होता. यानंतर आता अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं पुन्हा एकदा यावर भाष्य केलं आहे.

रश्मीनं सांगितलं की, तिला अॅक्ट्रेस नव्हतं व्हायचं. तिला एअर होस्टेस किंवा मग कोरियोग्राफर व्हायचं होतं. परंतु नशीबात मात्र अॅक्ट्रेस होणंच लिहिलं असावं. रश्मी म्हणाली, “मला डान्सची खूप आवड होती. मी आईला सांगितलं की, मला डान्स क्लास जॉईन करायचा आहे. यानंतर आईनं एका एका अंकलच्या मदतीनं एका डान्स टीचरसोबत बातचित केली. पंरतु फी देण्याएवढेही पैसे त्यावेळी आमच्याकडे नव्हते.”

रश्मी सांगते, “माझी आई डान्स टीचरला म्हणाली होती की, प्रत्येक महिन्यात देण्यासाठी माझ्याकडे 350 रुपये नाहीत. परंतु मी थोडेफार पैसे देऊ शकते. जर तुम्ही कमी पैशात शिकवू शकत असाल तर माझ्या मुलीला डान्स शिकवा. यानंतर मी क्लास जॉईन केला. आधी मी भरतनाट्यम शिकले. नंतर तीन वर्षांनंतर बॉलिवूड स्टाईल. या सगळ्या प्रवासात मला आईनं खूप साथ दिली” असंही तिनं सांगितलं.

https://www.instagram.com/p/B_eKblWgm50/

रश्मीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सध्या ती नागिन 4 मालिकेत काम करत आहे. यात ती शलाकाची भूमिका साकारत आहे. रश्मीनं जास्मीन भसीनली रिप्लेस केलं आहे. सध्या लॉकडाऊन असल्यानं सर्व मालिका बंद आहेत.

https://www.instagram.com/p/B_jhw4sAUhZ/

https://www.instagram.com/p/B-6Xe6FAp0_/