Rashmi Shukla | IPS अधिकारी रश्मी शुक्ला कोरेगाव-भीमा चौकशी आयोगासमोर हजर राहणार?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rashmi Shukla | पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची कोरेगाव-भीमा (Koregaon Bhima) येथील दंगल प्रकरणी चौकशी आयोगासमोर (Commission of Inquiry) दोन दिवस साक्ष होणार आहे. शुक्ला यांची मंबईमध्ये सह्याद्री गेस्ट हाऊसमध्ये आज (गुरूवारी) आणि उद्या (शुक्रवारी) साक्ष नोंदविली जाणार आहे.

 

हिंसाचार प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या न्यायमूर्ती जे. एन. पटेल आयोगाने (Justice J. N. Patel Commission) रश्मी शुक्ला यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. या चौकशीला माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला या हजर राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

दरम्यान, रश्मी शुक्ला या पुणे पोलीस आयुक्त असताना ही हिंसा घडली होती. यावेळी परमबीर सिंह (Parambir Singh) कायदा सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक होते. दरम्यान, 2018 साली दंगलीत झालेल्या हिंसाचारानंतर राज्य सरकारने (Maharashtra Government) या प्रकरणी माजी न्यायाधीश जे . एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. याप्रकरणी चौकशी सुरू आहे.

 

Web Title :- Rashmi Shukla | IPS officer rashmi shukla koregaon bhima inquiry commission

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Nawab Malik | बनावट नोटांवरून नवाब मलिकांचा एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंवर नवीन आरोप, म्हणाले…

7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राची भेट ! 18 महिन्यांपासून रखडलेल्या DA थकबाकीबाबत मोठं अपडेट आलं समोर

Life Certificate | केवळ 13 शिल्लक ! पेन्शनर्सने लवकर जमा करावा आपला हयातीचा दाखला, अन्यथा होईल नुकसान