मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Rashmi Shukla | आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करावी, अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेसने (Congress) केली होती. शुक्ला यांच्यावर विरोधी पक्षातील राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग (Phone Tapping Case Maharashtra) केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले होते. हे लक्षात घेऊन शुक्ला यांची तातडीने बदली करण्याची मागणी करण्यात येत होती. दरम्यान याबाबतची मागणी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना लिहिलेल्या पत्रात करण्यात आली होती.
रश्मी शुक्ला यांची सेवा जून २०२४ रोजी समाप्त झाली असतानाही भाजप, युती सरकारने जानेवारी २०२६ पर्यंत त्यांना नियमबाह्य बढती दिली होती, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. तसंच रश्मी शुक्ला यांची कार्यपद्धती अत्यंत वादग्रस्त राहिली असून नियमबाह्य कामे करणे तसेच विरोधी पक्षांतील नेत्यांना धमकावण्याची कामे त्यांनी केली आहेत,असाही आरोप पटोलेंकडून (Nana Patole) करण्यात आला होता. (Mahavikas Aghadi)
त्यानंतर आता अखेर रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरुन हटवलं असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसच्या आक्षेपानंतर आता भारतीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. सध्या राज्यात विधानसभेची निवडणूक लागलेली आहे. एकीकडे या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना दुसरीकडे निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचा आदेश दिला आहे.