आई संपादक झाल्यानंतर आदित्य ठाकरेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या संपादकपदी रश्मी ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सामनाचे कार्यकरी संपादक म्हणून संजय राऊत काम पहात आहेत. सामना नेहमीच आग्रलेखांसाठी प्रसिद्ध आहे. आता सामनाच्या संपादकपदी रश्मी ठाकरे यांची निवड झाल्याने त्या सामनामध्ये काय बदल करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पुण्यात आयोजित एका कार्यक्रमला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आले होते. कार्यक्रमानंतर आदित्य ठाकरे यांना रश्मी ठाकरे यांच्या संपादकपदी निवड झाल्याबद्दल प्रतिक्रीया विचारण्यात आली. त्यावेळी ते म्हणाले, सामनाच्या संपादकपदी आईची निवड झाल्याने आनंद आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. ही एक मोठी जबाबदारी आहे, आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत आहोत. दरम्यान उद्धव ठाकरे हे सामनाचे संपादक होते. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी ते या जबाबदारीतून मुक्त झाले होते.

सामनामधून शिवसेनेची राजकीय भूमिका, विचार प्रखरपणे मांडले जातात. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत सामनाचे कार्यकारी संपादक आहेत. सामनामध्ये लिहण्यात येणारे आग्रलेखांची चर्चा देशभरात होत असते. 90 च्या दशकात आपली राजकीय भूमिका, विचार महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी दिवंगत शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या दैनिकाची सुरुवात केली होती.

उद्धव ठाकरे हे संपादक असताना त्यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी आली. संपादक पद हे लाभाचे पद असल्यामुळे ते उद्धव ठाकरे यांच्याकडे ठेवण्यात अडचणी होत्या. सामनाच्या क्रेडिट लाईनमध्ये रश्मी ठाकरे यांचे नाव अधिकृतरित्या प्रसिद्ध करण्यात आले आहे. मागील काही दिवसापासून हे पद रिक्त होते.