‘पाटणकर ते ठाकरे’ ! असा आहे दुसऱ्या ‘माँ साहेब’ यांचा प्रवास

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचा सत्तासंघर्ष सर्वांनी पाहिला. मातोश्रीवरुन अनेक आदेश आले. ज्यामागे आवाज कोणाचा याचे अंदाज आता बांधले जात आहेत. आता रश्मी ठाकरे शिवसेनेच्या या सत्तासंघर्षात माँ साहेब – 2 म्हणून भूमिका बजावत असल्याचे सांगितले जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या आई मीनाताई ठाकरे यांची ओळख माँ साहेब म्हणून होती हे अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे. परंतू आता ठाकरे कुटूंबाला पुन्हा एकदा दुसऱ्या माँ साहेब मिळाल्या आहेत.

असे म्हणले जाते की वर्षा बंगल्याची आकांक्षा उद्धव ठाकरेंनी का बाळगली तर ते रश्मी ठाकरेंच्या आग्रहामुळे. तळागळात पक्षाची परिस्थिती काय आहे याचा लेखाजोखा रश्मी ठाकरेंनी कायम ठेवला. त्यामुळे आता भाजपमागे शिवसेनेची फरफट खूप झाली आता बस. ही सर्व तळागाळातील शिवसैनिकांची खदखद रश्मी ठाकरे यांनी मातोश्रीवर मांडली. असे ही सांगितले जाते की केवळ भाजपशी दोन हात करण्याबाबत नाही, तर पक्षांतर्गत होणाऱ्या बारीक-सारीक हालचालींवर रश्मी ठाकरेंची नजर असते. कोणतीही नकारात्मकता उद्धव ठाकरेंपर्यंत त्या पोहचू देत नाहीत. याच कारणाने शिवसैनिकांसाठी रश्मी ठाकरे माँ साहेब ठरल्या आहेत.

उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांनी उत्तराधिकारी म्हणून घोषित करावे यामागे देखील रश्मी ठाकरेच असल्याचे बोलले जाते. राज ठाकरेंनी शिवसेनेला राम राम ठोकला तेव्हा रश्मी ठाकरे उद्धव ठाकरेंच्या मागे खंबीरपणे उभ्या राहिल्या. शिवसेनेत महिला आघाडीची धुरा रश्मी ठाकरेंनी समर्थपणे संभाळली. विशेष म्हणजे रश्मी ठाकरे नीता अंबानी असो वा ऐश्वर्या राय-बच्चन सर्वांमध्ये सहज मिसळतात.

डोंबिवलीत रश्मी ठाकरेंचा जन्म झाला, संघाच्या बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या डोंबिवलीत त्या मोठ्या झाल्या. रश्मी ठाकरेंच्या माहेरचे नाव पाटणकर. त्यांना गझलची आवड. मुलगा आदित्य, तेजस प्रत्येक गोष्टीत त्या सहभागी असतात. त्यांना प्रोस्ताहन दिले. राजकारणात त्या प्रत्यक्षपणे सहभागी नसल्या तरी पडद्यामागे त्यांनी मोठी महत्वाची भूमिका निभावली.

भाजपच्या विरोधात शिवसेनेने घेतलेल्या ठाम भूमिकेत रश्मी ठाकरेंचा पूर्वीचा अनुभव कामी आल्याचे सांगितले जाते. शिवसेनेच्या रणनीतीकारांमध्ये त्यांनी भूमिका महत्वाची आहे. परंतू त्यांनी पडद्यामागे राहणेच पसंत केले. परंतू हे खरे की शिवसेनेला रश्मी ठाकरेंच्या रुपात नव्या माँ साहेब मिळाल्या.

Visit : Policenama.com