मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचे सासरे, रश्मी ठाकरे यांचे वडिल माधव पाटणकर यांचे मुंबईत निधन

मुंबर्ई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सासरे आणि रश्मी ठाकरे यांचे वडिल माधव पाटणकर यांचे निधन झाले आहे. ते 78 वर्षाचे होते. मुंबईतील अंधेरी येथील क्रिटीकेअर हॉस्पीटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती ठीक नसल्याने त्यांना क्रिटीकेअर हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माधव पाटणकर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला असून पाटणकर आणि ठाकरे कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजाण सहभागी आहोत असे म्हणून श्रध्दांजली वाहिली आहे. माधव पाटणकर यांच्या निधनामुळे पाटणकर आणि ठाकरे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.