‘हॉट’ किसींग सीन दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीचा तुटला चक्‍क साखरपुडा (व्हिडीओ)

मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन – सगळ्यांचा आवडता चित्रपट ‘बाहुबली’ या चित्रपटामधील मुख्य भूमिका साकारणारा प्रभास याला तर सगळ्या चाहत्यांना चांगलेच डोक्यावर घेतले. त्याचा चाहता वर्ग आधीच मोठा होता पण ‘बाहुबली’ चित्रपटामुळे त्याच्या चाहत्यांच्या यादीमध्ये आणखी वाढ झाली. चित्रपटामुळे तो खूपच चर्चेमध्ये आला. त्याच्यानंतर सध्या अभिनेता विजय देवरकोंडा याची चर्चा जोरदार आहे. चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’ नंतर अभिनेता विजय देवरकोंडा चांगला चर्चेमध्ये आला आहे. या प्रसिद्ध अभिनेत्यामुळे एका अभिनेत्रीचा साखरपुडा तुटल्याचे बातमी समोर आली आहे. कोण आहे ही अभिनेत्री ? आणि काय कनेक्शन असेल तिचे या अभिनेत्यासोबत असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहे.

https://www.instagram.com/p/ByuKktkA4OT/

https://www.instagram.com/p/ByuKotsAC52/

या अभिनेत्रीचे नाव आहे रश्मिका मंदाना जिचा साखरपुडा विजयमुळे तुटला आहे. अभिनेता विजय देवरकोंडाचा ‘डियर कॉम्रेड’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत विजयसोबत दिसून येणार आहे. ‘डियर कॉम्रेड’ चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपुर्वीच प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा ट्रेलर रश्मिकाच्या भावी नवऱ्याने पाहिले आणि तो खूप चिडला आणि त्याने लगेचच साखरपुडा तोडला. रश्मिकाने कन्नड चित्रपटाचा अभिनेता रक्षित शेट्टीसोबत साखरपुडा केला होता पण हा साखरपुडा तुटला आहे. त्यांचा साखरपुडा तुटण्याचे कारण अद्याप समजले नाही.

‘डियर कॉम्रेड’ च्या ट्रेलरमध्ये रश्मिका आणि विजय यांच्या एक हॉट किसींग सीनमुळे कदाचित रक्षित चिडला असावा आणि त्यामुळे त्याने साखरपुडा तोडल्याचा अंदाज लावला जात आहे. ‘डियर कॉम्रेड’ ट्रेलरमधील किसींग सीनची खूपच चर्चा होत आहे. याआधी हा किसींग सीन साई पल्लवीला करण्याची ऑफर आली होती पण तिने हा सीन नाकारला आणि मेकर्सने तिच्याऐवजी रश्मिका मंदानाला सीन करण्याची ऑफर केली. त्यानंतर या सीनला शूट करण्यात आले. दक्षिणात्य सिनेमांमध्ये किसींग सीन फार कमी पहायला मिळतात पण विजय आणि रश्मिका यांनी यामध्ये बेधडक सीन दिले आहेत. सध्या सोशल मिडियावर या सीनची चर्चा जोरदार सुरु आहे.

 

आरोग्यविषयक वृत्त –