Rashmika Mandanna | ‘श्रीवल्ली’च्या प्रेमात पडला चक्क चिंपांझी, व्हायरल व्हिडिओ पाहून प्रेक्षकांना बसला धक्का..
पोलीसनामा ऑनलाइन टीम – अवघ्या देशाला ‘पुष्पा’ या चित्रपटानं वेड लावलं आहे. ‘पुष्पा (Pushpa)’ या चित्रपटामध्ये दक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि अभिनेत्री रश्मिका मंदांना (Rashmika Mandanna) यांनी मुख्य भूमिका साकारली होती. चित्रपट प्रदर्शित होऊन बरेच दिवस लोटले असून, अद्याप या चित्रपटाची लोकप्रियता कायम आहे. यामध्ये रश्मिकानं (Rashmika Mandanna) श्रीवल्ली हे पात्र साकारलं असून, अल्लूनं पुष्पा हे पात्र साकारलं आहे.
‘पुष्पा (Pushpa: The Rise)’ या चित्रपटामधील अनेक डायलॉग्स (Pushpa Movie Dialogue), गाणी तसेच मुख्य पात्र पुष्पाची स्टाईल चांगलीच गाजली. तसेच या चित्रपटानं अवघ्या देशभरात धुमाकूळ घातलाय. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच चित्रपटावर अनेक रील आणि व्हिडीओ तयार करून शेअर केले आहेत.
दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ (Rashmika Mandanna Viral Video) तुफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये चक्क एक माकड श्रीवल्लीच्या (Rashmika Mandanna) प्रेमात पडलेलं दिसत आहे. तर बहुदा पुष्पाच्या प्रेमापेक्षा श्रीवल्लीला (Srivalli) हे नवं प्रेम जास्त आवडू शकेल. कारण हे प्रेम एका अबोल प्राण्याचं आहे. तर सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक भलामोठा चिंपांझी ‘श्रीवल्ली’ या गाण्यावर नाचत आहे. तो व्हिडिओमध्ये या गाण्यातील (Srivalli Song)
गाजलेली स्टेप करताना दिसत आहे. या व्हिडिओला (Trending Video)
लाखो व्ह्यूज मिळाले असून, पाहणाऱ्या प्रत्येकाला चांगला धक्का बसत आहे.
मात्र इंटरनेटवर सध्या चिंपंझीचं श्रीवल्ली प्रकरण चांगलंच गाजत असताना दिसत आहे.
Web Title :- Rashmika Mandanna | pushpa srivalli song chimpanzee dance viral video
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update