Rashmika Mandanna Upcoming Movie | रश्मिका मंदानानं ‘या’ नामवंत अभिनेत्रीकडून हिसकवून घेतली बिग बजेट फिल्म, आगामी चित्रपटात करणार रणबीर कपूर सोबत रोमान्स !
पोलीसनामा ऑनलाइन टीम – दक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna Upcoming Movie) हिनं बहुचर्चित चित्रपट ‘पुष्पा (Pushpa)’ मध्ये ‘श्रीवल्ली (Srivalli)’ ही भूमिका साकारून चांगलीच प्रसिद्धी मिळवली. या चित्रपटामधून ती प्रेक्षकांच्या घराघरात पोहचली. आपल्या अभिनयानं तिनं यशाचं उच्च शिखर गाठलं आहे. तर अवघ्या कमी वयातच तिनं आपली स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. नुकतीच तिच्या बद्दल एक बातमी व्हायरल होत आहे. तिनं चक्क बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीला टक्कर दिली आहे. बॉलीवूडमधील अभिनेत्रीकडून तिनं चक्क बिग बजेट फिल्म (Rashmika Mandanna Upcoming Movie) हिसकावून घेतली आहे.
माहितीनुसार, रश्मिका ‘एनिमल (Animal)’ या आगामी चित्रपटामध्ये दिसणार आहे. याआधी या चित्रपटात अभिनेत्री परिणाती चोप्राला (Parineeti Chopra) घेतलं होत. मात्र तिला या चित्रपटामधून निरोप दिला असून, त्यांनी रश्मिकाला घेतलं आहे. तिनं नुकतंच ‘एनिमल’ (Animal Film) या चित्रपटाला साईन केलं आहे. या चित्रपटामध्ये तिच्या सोबत रणबीर कपूर (Ranbir Kapoor) दिसणार आहे. चित्रपटात या दोघांचा ऑन स्क्रिन रोमान्स (Rashmika – Ranbir Romance) दिसणार आहे.
दरम्यान, ‘एनिमल’ या आगामी चित्रपटाचं (Upcoming Movie – Animal)
शूटिंग चालू करण्यात आलं असून, रश्मिका आणि रणबीर सोबतच अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor)
आणि बॉबी देओल (Bobby Deol) सुद्धा आपल्याला दिसणार आहे.
हा चित्रपट संदीप रेड्डी (Sandeep Reddy)
यांनी दिग्दर्शित केला असून, भूषण कुमार (Bhushan Kumar) निर्माते आहेत.
Web Title :- Rashmika Mandanna Upcoming Movie | pushpa srivalli aka rashmika mandanna snatches animal film from parineeti chopra opposite ranbir kapoor
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime | लोणावळ्यात 4 कोटींची रोकड जप्त, दोघांना अटक