पोलीसनामा ऑनलाइन टीम – Rashmika Mandanna | दक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानानं (Rashmika Mandanna Upcoming Movie) नुकतंच बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आहे. आपल्या दमदार अभिनयानमुळे तिनं स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. ती नेहमीच तिच्या क्यूट एक्सप्रेशन चाहत्यांना घायाळ करत असते. अलीकडेच तिची एक मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे (Rashmika Mandanna Upcoming Movie). रश्मिका नुकतंच दिग्दर्शक संदीप रेड्डी वांग (Sandeep Reddy Vanga) यांच्या ‘एनिमल (Animal)’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटामध्ये ती मुख्य भूमिकेत असून, तिच्या सोबत अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आपल्याला पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटामध्ये तिला मिळालेल्या मुख्य भूमिकेबद्दल तिनं आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे (Rashmika Mandanna Upcoming Movie). रश्मिका मंदानाने पिंकविलाच्या मुलाखतीमध्ये आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ती म्हणाली, ‘मी खूप रोमांचित आहे. मला अखेर एनिमल या चित्रपटामध्ये घोषित करण्यात आलं. मी सगळ्या जगाला हे सांगण्यासाठी आतुर झाले होते. कारण केवळ कथाच नव्हे, तर ही पूर्ण टीम सुद्धा अप्रतिम आहे, आणि मला या अप्रतिम टीम सोबत काम करायला मिळालं.’
पूढे रश्मिका म्हणाली, ‘हे एक स्वप्न आहे, जे सत्यात उतरलंय. मी लवकरच उन्हाळ्याची वाट पाहत आहे. तसेच प्रामाणिकपणे हा चित्रपट लवकरच उंची गाठेल याची वाट बघते. माझ्या भूमिकेबद्दल घोषणा मी ‘गुड बाय (Good Bye)’च्या सेटवर असताना झाली. मागील काही दिवस माझ्यासाठी अत्यंत आनंददायी होते, कारण अखेर माझ्या एनिमल आणि इतर आगामी प्रोजेक्ट्स बद्दल घोषणा करण्यात आली.
दरम्यान, याआधी या चित्रपटामध्ये अभिनेत्री परिनीती चोप्राला (Parineeti Chopra) घेण्यात आलं होत, मात्र तिच्या आगामी प्रोजेक्टमुळं आणि व्यस्त शेड्युलमुळं तिनं हा चित्रपट नाकारला. आता या चित्रपटामध्ये रश्मिका मंदाना ही रणबीर कपूरच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. तसेच प्रेक्षकांना प्रथमच रणबीर आणि रश्मिका (Ranbir Kapoor – Rashmika Mandanna) एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.
Web Title : Rashmika Mandanna Upcoming Movie | rashmika mandanna reacts
to film animal with ranbir kapoor says it is like a dream come true
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Charity Pune Division | 2 हजार प्रकरणे निकाली काढून धर्मादाय पुणे विभाग महाराष्ट्रात पुन्हा अव्वल