राष्ट्रीय लोक अदालत मार्फत २ कोटी २८ लाख ४४ हजार ९७१ रुपयांची मालमत्ता वसूल

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने असलेल्या राष्ट्रीय लोक अदालती मार्फत धुळे शहरातील थकीत मालमत्ता धारकांना शास्ती मध्ये माफी देण्याची योजना राबविण्यात आली होती. यामध्ये आज सुमारे सोळाशे थकीत मालमत्ता कर धारकांनी आपल्या थकीत कराचा भरणा केलेला आहे. यात रोख रक्कम रु. 1,07,50,459 तसेच धनादेशाद्वारे रू. 1,20,94,512 रक्कम अशी एकूण 2,28,44,971 मालमत्ता कराची रक्कम जमा झालेली आहे.

आज सकाळी साडे दहा वाजेपासून यासाठी धुळे महानगरपालिका मार्फत एकूण 5 कॅश काऊंटर तसेच 5 चेक काऊंटर नागरिकांच्या सोयीसाठी जिल्हा न्यायालयाच्या आवारात लावण्यात आलेले होते. मागील अनुभव लक्षात घेता या साठी विविध कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. सुमारे बारा पथकांची नियुक्ती करण्यात येऊन नागरिकांना माहिती देण्यासाठी व असलेल्या थकीत मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले होते. यात सुमारे 80 कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

या संपूर्ण व्यवस्थेची पाहणी जिल्हा सत्र न्यायाधीश न्यायमुर्ती मंगला धोटे तसेच विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायमूर्ती डोंगरे व आयुक्त अजीज शेख तसेच उपायुक्त गणेश गिरी यांनी केली.
या कामासाठी एचडीएफसी बँकेचे सचिन अग्रवाल यांनी बँकेचे कर्मचारी उपलब्ध करून दिले होते.
या राष्ट्रीय लोक अदालत तिच्या कार्यवाहीसाठी सहाय्यक आयुक्त शांताराम गोसावी तसेच  लेखाधिकारी पल्लवी शिरसाट, अभियंता कैलास शिंदे, वसुली अधीक्षक बळवंत रणाळकर, नगररचनाकार महेंद्र परदेशी, अधीक्षक रमजान अन्सारी,संगणकतज्ञ श्री. बासिड पठाण, नगर सचिव मनोज वाघ, लेखापाल प्रदीप नाईक व अन्य खातेप्रमुख सर्व व्यवस्थेवर नियंत्रण ठेवून होते.

आज झालेल्या कारवाईत मनपातील वसुली विभागातील वसुली निरीक्षक सर्व कर्मचारी तसेच मानधनावरील संगणक चालक यांनी परिश्रम घेतले.