Rasta Roko Andolan For Dhangar Reservation | धनगर आरक्षणावरून 23 तारखेला राज्यभर रास्ता रोको; गोपीचंद पडळकरांचे आवाहन, म्हणाले – “मी सरकारमध्ये असलो तरी….”

Rasta Roko Andolan For Dhangar Reservation | dhangar samaj will hold a rasta roko andolan on monday across the maharashtra informed by bjp mla gopichand padalkar

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Rasta Roko Andolan For Dhangar Reservation | धनगर समाजाला एसटीमध्ये आरक्षण मिळावं यासाठी २३ तारखेला राज्यभर रास्ता रोको (Rasta Roko For Dhangar Reservation) करण्यात येणार असल्याची माहिती भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी दिली आहे. धनगर समाजाच्या आरक्षणावर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षण देण्यासाठी सरकारने (Mahayuti Govt) पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

धनगर समाजाला अनुसूचित जमातीतून आरक्षण देण्यासाठी धनगर आणि धनगड (Dhangad) या जाती एकच असल्याचा शासन आदेश काढण्यासाठी राज्य सरकारने एक समिती नेमली आहे. एकीकडे धनगर समाजाला अनुसूचित जातीतून आरक्षण देण्यासाठी सरकारकडून प्रयत्न होत आहे. तर दुसरीकडे एसटी समाजातील नेत्यांनी याला विरोध केला आहे. हा निर्णय झाल्यास काही आमदारांनी राजीनामा देणार असल्याचेही म्हंटले आहे.

यावरूनच आता आमदार गोपीचंद पडळकर यांनी रास्ता रोको करणार असल्याचे म्हंटले आहे. यासाठी सर्वानी एकत्र येण्याचं आवाहनही त्यांनी केले आहे.

गोपीचंद पडळकर म्हणाले, “मी सरकारमध्ये जरी असलो तरी सरकारच्या विरोधात आंदोलन का करतोय तर मी आधी समाजाचा आहे. सरकार सगळ्या बाबतीत सकारात्मक आहे, मी तशा प्रकारची कागदपत्रे सुद्धा सरकारकडे दिली आहेत. आदिवासी नेते आणि काहीजण मुद्दामून सरकारवर जीआर निघू नये यासाठी दबाव टाकत आहेत. आम्ही आदिवासी नेत्यांना विनंती करतो की आमच्या सोबत आणि सरकार सोबत चर्चा करा”, असे पडळकर यांनी म्हंटले.

ते पुढे म्हणाले, “आदिवासी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही. हे आम्ही लिहून दिलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत, त्यानुसार एसटीमध्ये वर्ग करून आम्हाला आमचं आरक्षण मिळणार आहे. आदिवासी नेते जर म्हणत असतील आम्ही पाणी कट करू, रूळ उखडून टाकू तर आम्ही सुद्धा मागे राहणार नाहीत.

आम्ही येत्या सोमवारी २३ तारखेला सकाळी ११ वाजता राज्यभर रास्ता रोको आंदोलन करणार आहोत. मी सर्व धनगर बांधवांना आवाहन करतो की तुम्ही या आंदोलनात सहभागी व्हावं”, असं पडळकर यांनी आवाहन केलं आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa

हे देखील वाचा

Laxmi Road Pune Crime News | विसर्जन मिरवणुकीत अश्लिल हावभाव करणार्‍यास जाब विचारल्याने टोळक्याची तरुणाला बेदम मारहाण

Ajit Pawar NCP Leader On Nitesh Rane | महायुतीत वादंग! राष्ट्रवादीच्या आमदाराची देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार; नितेश राणेंवर कारवाई करण्याची मागणी

Total
0
Shares
Related Posts
Satish Wagh Murder Case | Satish Wagh was killed by paying a supari of 5 lakhs; Out of the five accused, 3 accused were detained by the police; Neighbor committed act due to personal dispute (Video)

Satish Wagh Murder Case | सतीश वाघ यांची हत्या 5 लाखांची सुपारी देऊन; पाच आरोपींपैकी 3 आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात; शेजारी राहणार्‍याने वैयक्तिक वादातून केले कृत्य (Video)