अहमदनगर : मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे पैठण-पंढरपूर रस्त्यासाठी जमिनी अधिग्रहण केलेल्या बाधित शेतकऱ्यांना शासनाने तातडीने मोबदला देण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी बोधेगाव येथे राष्ट्रवादी काँगेसच्या वतीने डॉ. क्षितिज घुले यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे बोधेगाव परिसरातील वाहतूक खोळंबली होती.

यावेळी आंदोलनात राष्ट्रवादीचे कैलास नेमाने, संजय कोळगे, बाजार समितीचे संचालक रामनाथ राजपुर, सुधाकर तहकीक, राजेंद्र ढमढेरे, भाऊराव भोंगळे, एकनाथ कसाळ, मोहनराव देशमुख, किसन गलांडे, उपसभापती शिवाजी नेमाने, हनुमान पातकळ, अनिल घोरतळे, रोहित पारनेरे, सुरेश दुसंगे, सर्जेराव दहिफळे, क्षीरसागर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संतोष गायकवाड आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पैठण-पंढरपूर रस्त्याच्या कामात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत, त्यातील अनेकांना अद्याप कुठल्याही प्रकारचा मोबदला मिळाला नाही. याबाबत प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करण्यात आला, तरीही या मागण्यांकडे गांभीर्याने पाहण्यात आले नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांकडून आज बोधेगावात रास्ता-रोको आंदोलन करण्यात आले.

आरोग्यविषयक वृत्त –