पोलिस आयुक्तालयावर राष्ट्रवादीचा मोर्चा

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या जनसंपर्क कार्यालय तोडफोड करुन मोकाट असणाऱ्या मुख्य सूत्रधाराला तातडीने अटक करावी. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आला.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष , महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, माजी आमदार , नगरसेवक नाना काटे, संजय वाबळे, प्रशांत शितोळे, नगरसेविका संगीता ताम्हाणे, शमीम पठाण, फजल शेख, विशाल काळभोर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कार्यालय तोडफोड प्रकरणातील मुख्य सूत्रधार अद्याप फरार आहे. कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याने विरोधी पक्षनेते दत्ता साने आणि त्यांच्या कुटुंबीयांना पोलिस संरक्षण मिळावे अशीही मागणी केली. शहरात कायदा व सुव्यवस्था राखावी, अशा मागण्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या मोर्चादरम्यान करण्यात आल्या.morcha

दत्ता साने कार्यालय तोडफोड प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना कारवाईचे नुसतेच आश्वासन दिले जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय


सिने जगत –

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन