उंदराने टाकला हायप्रोफाइल दरोडा, लाखोंचे हिरे लंपास !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उंदरांचे अनेक कारनामे आपण ऐकले आहेत. यातील अनेक गोष्टी हैराण करणाऱ्या असतात. उंदरं अनेक गाेष्टींचे नुकसान करत असतात. काही दिवसांपूर्वी उंदरांनी लाखोंच्या नोटा कुरतडल्याचे वृत्तही समोर आले  होते. आता उंदरांनी केलेल्या हाय प्राेफाईल चोरीचं ताजं प्रकरण समोर आलं आहे. बिहारमधील एका ज्वेलरी शाॅपमधून लाखोंचे हिरे गायब झाले. यानंतर दुकानाच्या मालकाने पोलिसांत धाव घेतली. आधी दुकानातील कर्मचाऱ्यांवर संशय होता. परंतु पोलीस तपासात जे काही उघड झालं ते पाहून सर्वांनाच धक्का बसला.

पाटण्यातील एका ज्वेलरी शाॅपमधील लाखोंचे हिरे गायब झाले. यामुळे एकच खळबळ उडाली. मालकाला दुकानातील कर्मचाऱ्यांवर आधी संशय होता. मालकाने त्यांची चौकशी केली परंतु समोर काहीही आले नाही. यानंतर मालकाने पोलिसांत धाव घेतली. पोलीसही यामुळे चक्रावले होते. कारण त्यांना चौकशीत कोणी दोषी आढळले नाही. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज तपासले. तेव्हा या हिऱ्यांचा खुलासा झाला. सत्य पाहून सर्वांनाच धक्का बसला.

सीसीटीव्ही फूटेज तपासल्यानंतर खुलासा झाला की, ही हाय प्रोफाइल चोरी उंदरांनी केली आहे. दुकानाच्या सीलिंगमध्ये लपून बसलेले उंदीरच चोर निघाले. दुकानाच्या एका काेपऱ्यातून ते आत शिरले आणि त्यांनी लाखोंचे हिरे लंपास केले. सीसीटीव्हीमध्ये हे स्पष्टपणे दिसले की, कशाप्रकारे उंदरं ज्वेलरीचे पॅकेट्स दातांमध्ये घेऊन पसार झाले होते. उंदरं हिरे चोरून दुकानाच्या फॉल्स सीलिंगमध्ये शिरले. यानंतर संपूर्ण दुकानाची धूळ चाळूनही हिरे मिळाले नाहीत.

दरम्यान सीलिंगमध्ये हिऱ्यांचा शोध अजूनही सुरु आहे. सध्या ही आगळी वेगळी चोरी चर्चेचा विषय ठरत असून सगळीकडे ही गोष्ट व्हायरल होत आहे. कारण काही दिवसांपूर्वीच उंदरांनी सरकारी दारू फस्त केल्याची घटना समोर आली होती. तर एका एटीममधील नोटाही काही उंदरांनी खाल्ल्या होत्या. या घटनाही वाऱ्यासारख्या पसरल्या होत्या.

ह्याही बातम्या वाचा –

केंद्र सरकारची मोठी घोषणा , ग्रॅच्युइटी करमुक्त !

भारतावर बॉम्ब हल्ले करण्यासाठी आम्ही ‘मसूद’चा वापर केला ; पाकिस्तान तोंडघशी

RBI लवकरच जारी करणार २० रुपयाचे नाणे ; ‘ही’ असणार नाण्याची खासियत

अखेर स्थायी सभापतीपदी विलास मडिगेरी यांची निवड

पुणे वाहतुक पोलिसांची ‘वसूली’ मोहिम जोरात