इथल्या उंदरांना लागलीय दारूची चटक … चोरली २०० कॅन दारू

कैमूर: वृत्तसंस्था 
आतापर्यंत तुम्ही माणसांनी दारू चोरल्याच्या घटनांविषयी ऐकले असेल पण बिहारच्या कैमुरमधील उंदरांनी चक्क दारूच्या बाटल्या चोरल्याचा दावा करण्यात आला आहे. एरव्ही उंदरांनी कपडे कुरतडल्याच्या , लाडू खाल्ल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत पण बिहारमधल्या उंदरांना चक्क दारूचं व्यसन लागलय येथील एका गोदामामधील तब्बल २०० कॅन दारू एकाकी गायब झाली असून ही उंदरांनीच चोरली असल्याचा दावा स्थानिक अधिकाऱ्यांनी केला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6b5d204a-c7a0-11e8-88ed-c9da0bc74b05′]

२०१६ मध्ये बिहारमध्ये संपूर्ण दारू बंदी लागू करण्यात आली. त्यानंतर ठिकठिकाणी छापे मारून पोलीस अवैध दारूचे साठे जप्त करत असतात. ही जप्त केलेली दारू प्रत्येक जिल्ह्यात काही शासकीय गोदामांमध्ये ठेवली जाते. अशाच एका शासकीय गोदामामध्ये जप्त केलेली तब्बल २०० कॅन दारू ठेवण्यात आली होती. पण या गोदामामधील अनेक कॅन रिकामे झाल्याचं आढळून आलंय. अनेक कॅनमध्ये छिद्रं पडली आहेत तर काही कॅनच नाहीसे झाले आहेत. यावर संबंधित अधिकाऱ्यांना विचारलं असता हा सगळा गोदामातील उंदरांचा प्रताप असल्याचं त्यांनी सांगितलंय. ‘या गोदामात कायमच दारू ठेवली जाते. त्यामुळे येथील उंदरांना दारूचं व्यसन जडलं आहे. सगळ्या सीलबंद बाटल्या फोडून उंदीर दारू प्यायले आणि ज्या फोडता आल्या नाहीत त्या बाटल्या उंदीर ओढत ओढत घेऊन गेले’ अशी माहिती स्थानिक एसडीएम कुमारी अनुपमा सिंह यांनी दिली आहे.

सलग चौथ्या दिवशी शेअर बाजार कोसळला, डॉलरच्या तुलनेत रुपयाची विक्रमी घसरण

बिहारमध्ये उंदरांना दारूचे व्यसन लागल्याची ही काही पहिलीच घटना नाही. काही महिन्यांपूर्वी पाटण्यातील तब्बल ९ लाख लिटर दारू उंदरांनी फस्त केली होती. दरम्यान कैमूर जिल्ह्यात तरी गोदामातील दारू अधिकाऱ्यांनीच संपवली असल्याची चर्चा आहे.

 [amazon_link asins=’B01IVSW2LM,B014T2QIKU’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cd5bd6a4-c7a1-11e8-b346-f1ba8788479e’]